ऑर्किड स्कुलच्या सहा विद्यार्थ्यांची विभागीय स्पर्धेसाठी निवड
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सोलापूर जिल्हा क्रीडा विभाग व सोलापूर महापालिकेच्या वतीने आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय स्पर्धेतून शहरातील नागेश करजगी ऑर्किड स्कुलच्या सहा विद्यार्थ्यांची विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली. यामध्ये १४ वर्षीय गटातून रोलर स्केटिंग मध्ये प्रतीक शिंदे यास गोल्ड मेडल, तायकॉदों मध्ये मयांक बोऱ्हाडे व युग गायकवाड यास अनुक्रमे गोल्ड व सिल्वर मेडल व मृण्माई गायकवाड लॉंन टेनिस सिल्वर मेडल तर १४ वर्षीय गटातून लॉन टेनिस स्पर्धेत रिषभ गोचडे व ईश्वराज होमकर यांनी ब्रॉन्झ मेडल प्राप्त केले.या सर्व खेळाडूंची केलेली उत्कृष्ट कामगिरी पाहता त्यांची विभागीय स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे. या सर्व यशस्वी खेळाडूंचे संस्थेचे अध्यक्ष डॉ.कुमार दादा करजगी,संस्थेच्या सचिवा वर्षाताई विभुते, स्कुलचे व्यवस्थापक अक्षय चिडगुंपी, प्राचार्या रुपाली हजारे, शाळेच्या मार्गदर्शिका मीना पारखे यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
या खेळाडूंना शाळेचे क्रीडा शिक्षक आनंद लिगाडे व ज्ञानदीप जाधव यांचे मार्गदर्शन लाभले.
0 Comments