Hot Posts

6/recent/ticker-posts

माढा येथे सैनिक परिवारातील सदस्यांना ‘जय जवान प्लस शिष्यवृत्ती’ ची संधी

 माढा येथे सैनिक परिवारातील सदस्यांना ‘जय जवान प्लस शिष्यवृत्ती’ ची संधी




अकलूज (कटूसत्य वृत्त):- माढा लोकसभा मतदारसंघातील पाच सैनिक परीवारातील किंवा निवृत्त सैनिकांना पंजाब येथील लव्हली प्रोफेशनल युनिव्हर्सिटी (एलपीयू) च्या ‘जय जवान प्लस शिष्यवृत्ती’ अंतर्गत ऑनलाइन डिग्री कार्यक्रमांमध्ये प्रवेशाची संधी मिळणार आहे. याची माहीती आज खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी दिली.

या शिष्यवृत्ती योजनेत निवड झालेल्या उमेदवारांना १०० टक्के फी माफी मिळणार असून, प्रवेशाची अंतिम मुदत ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत आहे.

शिष्यवृत्तीसाठी पात्रता
सैन्यदलातील (आर्मी, नेव्ही, एअरफोर्स) सेवेत असलेल्या तसेच निवृत्त सैनिकांना आणि त्यांच्या पत्नी/पती, मुलगा/मुलगी यांना मेळेल.

योजनेतील उपलब्ध अभ्यासक्रम
पदव्युत्तर अभ्यासक्रम (PG): एमबीए, एमसीए, एमए (इंग्रजी, राज्यशास्त्र, इतिहास, समाजशास्त्र), एम.एस्सी. (अर्थशास्त्र, गणित), एम.कॉम

पदवी अभ्यासक्रम (UG): बीए, बीसीए, बीबीए
डिप्लोमा अभ्यासक्रम: डीबीए, डीसीए

आवश्यक कागदपत्रे
१. खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्याकडून नामनिर्देशन पत्र
२. निवृत्त सैनिक किंवा सेवेत असलेल्या सैनिकांचे ओळखपत्र आणि नाते दाखवणारा पुरावा
३. पासपोर्ट आकाराचा फोटो आणि सही
४. ⁠आधार कार्ड
५. ⁠शैक्षणिक प्रमाणपत्रे (१०वी, १२वी आणि पदवी/पदव्युत्तर)

प्रवेश प्रक्रिया
इच्छुक उमेदवारांना आवश्यक कागदपत्रांसह ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत लव्हली प्रोफेशनल युनिव्हसिटीच्या अधिकृत संकेतस्थळावरून फॅार्म भरता येईल, किंवा खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या जनसंपर्क कार्यालयास सर्व कागदपत्रासह संपर्क करावा असे आवाहन करण्यात आले आहे.
Reactions

Post a Comment

0 Comments