सोलापूरात पावसाचा हाहाकार : रिक्षाचालक गेला वाहून - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, September 15, 2025

सोलापूरात पावसाचा हाहाकार : रिक्षाचालक गेला वाहून

 सोलापूरात पावसाचा हाहाकार : रिक्षाचालक गेला वाहून




सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सोलापूर शहरासह जिल्ह्यात चार दिवसांपासून मुसळधार पाऊस होत आहे. जोरदार पावसाने झोडपून काढल्याने पूरस्थिती निर्माण झाली असून अनेक भागात पाणी साचले आहे.

दरम्यान सोलापुरात पुन्हा एकदा रात्री मुसळधार पाऊस झाला. यामुळे रस्त्यावरून पाणी वाहत असून छत्रपती संभाजी महाराज चौका जवळील पुना नाका येथे पुलावरून वाहणाऱ्या पाण्यातून रिक्षा टाकल्याने एक रिक्षा चालक वाहून गेल्याची घटना घडली आहे.

सोलापूर जिल्ह्याला जोरदार पावसाचा तडाखा बसत आहे. यातच सोलापूर शहर परिसरात ११ सप्टेंबरला जोरदार पावसाने झोडपून काढले होते. या पावसामुळे मार्केट परिसरात पाणी साचल्याने दुकानांमध्ये पाणी शिरले होते. शिवाय काही भागातील घरांमध्ये पाणी गेल्याने घरातील साहित्याचे देखील मोठे नुकसान झाले होते. परिणामी जनजीवन विस्कळीत झाले होते. यानंतर पुन्हा एकदा सोलापूरमध्ये जोरदार पावसाचा तडाखा बसला आहे.

मध्यरात्रीच्या सुमारास सोलापूर शहर व परिसरात जोरदार पाऊस झाला. यामुळे नाल्यांना पूर देखील आला होता. दरम्यान सोलापुरातील छत्रपती संभाजी महाराज चौकजवळ असलेल्या नाल्यावरील पुलावर प्रचंड पाणी वाहत असताना रिक्षाचालकाने पुलावरून गाडी नेण्याचा प्रयत्न केला. यात तो वाहून गेल्याची घटना घडली आहे. सतीश सुनील शिंदे (वय ३६) असे वाहून गेलेल्या व्यक्तीचे नाव आहे.

दरम्यान रिक्षा चालक वाहून गेल्याची घटना उघडकीस आल्यानंतर सोलापूर अग्निशामक दलाकडून वाहून गेलेल्या रिक्षा चालकाचा शोध घेण्याचे काम मोठ्या प्रमाणात चालू आहे. मात्र नाल्याची पाण्याचा प्रवाह अधिक प्रमाणात असल्याने अद्याप त्याला शोध लागलेला नाही. तर सतीश शिंदे यांच्या कुटूंबियांनी एकच आक्रोश केला. घटनास्थळी पोलीस देखील दाखल झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सतीश सुनील शिंदे (वय 36) हा रिक्षाचालक पुलावरून गाडी नेण्याचा प्रयत्न करत असताना नाल्याच्या प्रचंड प्रवाहात वाहून गेला. रात्रीच्या वेळी अचानक वाढलेल्या पाण्यामुळे हा अपघात घडल्याचे सांगितले जाते.

घटनेची माहिती मिळताच सोलापूर अग्निशामक दल घटनास्थळी दाखल झाले असून वाहून गेलेल्या रिक्षाचालकाचा शोधमोहीम युद्धपातळीवर सुरू आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून, मुसळधार पावसामुळे नागरिकांना सुरक्षित राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages