Hot Posts

6/recent/ticker-posts

पूरग्रस्त कुटुंबांना मोफत धान्य वाटप; जिल्हा पुरवठा विभागाची तत्परतेने कार्यवाही

 पूरग्रस्त कुटुंबांना मोफत धान्य वाटपजिल्हा पुरवठा विभागाची तत्परतेने कार्यवाही


 

सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सोलापूर जिल्ह्यातील अतिवृष्टी व पूर परिस्थितीमुळे बाधित झालेल्या नागरिकांना शासनाच्या वतीने मोफत अन्नधान्य वाटप करण्यात येत असून जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा पुरवठा अधिकारी संतोष सरडे अत्यंत तत्परतेने मोफत धान्य वाटपाची कार्यवाही करत आहेत.

        जिल्हा पुरवठा अधिकारी श्री. संतोष सरडे यांनी सर्व तहसीलदारांना तातडीने पूरग्रस्त कुटुंबांना गतीने धान्य वितरण करण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या आहेत. कालपर्यंत अनेक तालुक्यांमध्ये गहू व तांदूळ प्रत्येकी १० किलो प्रमाणे मोफत वाटप करण्यात आले आहे. 

        लवकरच शासनाच्या वतीने पूरग्रस्त कुटुंबांना प्रती कुटुंब ३ किलो तूरडाळही वितरित करण्यात येणार असूनयासाठी जिल्हा प्रशासनाकडून आवश्यक कार्यवाही सुरू आहे. 

तालुकानिहाय धान्य वाटपाचा तपशील (कालपर्यंत): 

माढा तालुका – 254 कुटुंबांना 49 क्विंटल गहू व तांदूळ 

करमाळा तालुका – 80 कुटुंबांना 16 क्विंटल गहू व तांदूळ 

उत्तर सोलापूर – 604 कुटुंबांना 120.80 क्विंटल गहू व तांदूळ 

दक्षिण सोलापूर – 112 कुटुंबांना 22.40 क्विंटल गहू व तांदूळ 

मोहोळ तालुका – 516 कुटुंबांना 103.20 क्विंटल गहू व तांदूळ 

अक्कलकोट व सांगोला तालुका – माहिती संकलन प्रक्रियेत 

      जिल्हा प्रशासन पूरग्रस्तांच्या मदतीसाठी कटिबद्ध असूनअन्नधान्य वितरणासोबतच इतर आवश्यक मदत ही पूरग्रस्तापर्यंत अत्यंत काळजीपूर्वक पोहोचवली जात आहे.


Reactions

Post a Comment

0 Comments