Hot Posts

6/recent/ticker-posts

पारंपारिक वाद्याचा वापर केल्याने शांतता आणि सुव्यवस्था राखण्यास मदत होते- किसन जाधव

 पारंपारिक वाद्याचा वापर केल्याने शांतता आणि सुव्यवस्था राखण्यास मदत होते- किसन जाधव





सोलापूर (कटूसत्य वृत्त):- महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या शारदीय नवरात्र महोत्सवास २२ सप्टेंबर पासून प्रारंभ होत आहे. नवरात्र उत्सवाच्या तयारीसाठी सर्वत्र लगबग सुरू असून शक्ती देवीच्या प्राणप्रतिष्ठापना मिरवणूक निमित्त सोलापूर शहरात विविध मंडळाच्या वतीनं लेझीमच्या सरावाला वेग आला आहे. दरम्यान ईच्छा भगवंताची नवरात्र महोत्सव मंडळाच्या वतीनं यंदाच्या वर्षी मंडळाचे संस्थापक-आधारस्तंभ लक्ष्मण मामा जाधव यांच्या मार्गदर्शनाने मंडळांनी यंदाच्या वर्षी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेच जतन करत डीजे आणि मोठ्या ध्वनी यंत्रणामुळे होणारे ध्वनी प्रदूषण कमी करण्यासाठी पारंपारिक वाद्यांना मंडळांनी प्राधान्य दिला आहे. दरम्यान सोमवारी सायंकाळी मंडळाचे संस्थापक आधारस्तंभ लक्ष्मण मामा जाधव यांच्या हस्ते शक्ती देवीच्या प्राणप्रतिष्ठापना मिरवणुकीच्य निमित्ताने फटाक्यांच्या आतिषबाजीत संबळ आणि ढोल ताशाच्या निनादात भव्य लेझीम सराव ताफ्यांचा शुभारंभ करण्यात आला याप्रसंगी मंडळाचे मार्गदर्शक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव, अनिल दादा जाधव, कार्यसम्राट नगरसेवक नागेश गायकवाड, राजू दादा याराना, बबलू गायकवाड, नितेश गायकवाड, तुषार शिवाजी गायकवाड, सचिन विलास जाधव होटगीकर, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश युवक सरचिटणीस चेतन नागेश गायकवाड, आदित्य अनंतकर जाधव, सागर कांबळे अमोल लकडे, सचिन पिसे, शिवा बंडगर माऊली जरग, प्रेम नागेश गायकवाड, अमोल जगताप आदित्य जाधव, करण जाधव, कार्तिक जाधव, भुताळे कोळेकर, सोमनाथ कोळेकर, रामभाऊ पल्ली मिस्त्री, उत्कर्ष गायकवाड, तन्मेष गायकवाड, तेजस गायकवाड, प्रकाश जाधव आदींसह शेकडो इच्छा भगवंताची नवरात्रोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी मंडळाच्या कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतिषबाजी, आकर्षण विद्युत रोषणाई,सांभाळ, ढोल ताशा आणि हलगीच्या निनादात बहारदार शिस्तबद्ध असे लेझीमचे सादरीकरण केले. यंदाच्या वर्षी सोलापूर शहरांमध्ये पोलीस प्रशासन आणि विविध संघटनांच्या माध्यमातून डीजे डॉल्बीला विरोध दर्शविला होता याला सोलापुरातील मंडळांनी देखील सकारात्मकता दाखवत नुकत्याच गणेशोत्सवाच्या काळामध्ये डीजे डॉल्बीचा वापर टाळत पारंपारिक वाद्यांना प्राधान्य दिला होता याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्राची सांस्कृतिक परंपरेचे जतन करत पारंपारिक वाद्यांना प्राधान्य देणे हे काळाची गरज आहे. मिरवणुकांमध्ये पारंपारिक वाद्यांचा वापर केल्याने शांतता आणि सुव्यवस्था राखण्यास मदत होते पोलीस प्रशासनाने देखील डीजे ऐवजी पारंपारिक वाद्यांना प्राधान्य देण्याचे आवाहन केले जेणेकरून उत्सवाचा आनंद पारंपारिक पद्धतीने साजरा करता येईल याच उद्देशाने मंडळाचे संस्थापक आधारस्तंभ लक्ष्मण मामा जाधव यांच्या नेतृत्वाखाली यंदाच्या वर्षी ईच्छा भगवंताची नवरात्रोत्सवाच्या निमित्त सांस्कृतिक वारसाचे जतन करत आणि सोलापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, पोलीस आयुक्त एम राजकुमार, महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओंबासे आणि शहरातील विविध संघटनांनी डीजे डॉल्बी अशा कर्कश आवाजांना विरोध दर्शविला होता डीजे मुक्त मिरवणूक काढण्यात यावे असे आव्हान केले होते याला सकारात्मक प्रतिसाद देत यंदाच्या वर्षी पारंपारिक वाद्यांना प्राधान्य दिल्याचे किसन जाधव यांनी यावेळी सांगितले. यावेळी लेझीम सराव सादरीकरण पाहण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. मंडळाचे हजारो कार्यकर्त्यांनी आई राजा उदे उदे सदानंदीचा उदे उदे च्या गजरात लेझीम चा खेळ सादर केले.
Reactions

Post a Comment

0 Comments