विभागीय शिक्षण सहसंचालक डॉ. अजय जाधव यांचे कॉलेज कर्मचारी युनियनच्या वतीने स्वागत
सोलापूर, (कटूसत्य वृत्त):-
उच्च शिक्षण सोलापूर विभागीय शिक्षण सहसंचालक डॉ. अजय जाधव हे विभागीय शिक्षण सहसंचालक कार्यालयात रुजू झाले आहेत. त्यांचे सोलापूर जिल्हा कॉलेज कर्मचारी युनियनच्या वतीने स्वागत करण्यात आले. त्यांचे स्वागत व सत्कार युनियनचे अध्यक्ष दत्ता भोसले यांनी केले. यावेळी युनियनचे सरचिटणीस राजेंद्र गिड्डे, विद्यापीठ सिनेट सदस्य अजितकुमार संगवे, प्रभाकर माने, विभागीय शिक्षण सहसंचालक कार्यालयातील लेखा अधिकारी प्रज्ञा कांबळे, संजय लगदिवे, राजरत्न शिवशरण आदी उपस्थित होते.
यावेळी डॉ. जाधव यांनी विद्यापीठ व महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे प्रलंबित प्रश्न प्राधान्याने सोडविण्यात येतील, असे आश्वासन त्यांनी युनियनच्या पदाधिकाऱ्यांना दिले.
0 Comments