ग्रामपंचायतीनं किती पैसा खर्चला ? आता मोबाइलवर हिशेब तपासा !
गावाच्या ग्रामपंचायतीच्या वेबसाइटवर किंवा ई-ग्रामस्वराज पोर्टलवर तपासता येणार
सोलापूर : (कटूसत्य वृत्त):- तुमच्या गावाला किती निधी प्राप्त झालाय? कोणत्या कामासाठी किती खर्च केलाय? कोणकोणती कामे झालीत या सर्व गोष्टींची माहिती ऑनलाइन उपलब्ध आहे. हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला गावाच्या ग्रामपंचायतीच्या वेबसाइटवर किंवा ई- ग्रामस्वराज पोर्टलवर तपासता येणार आहे. शासनाने ग्रामविकास विभागाचा कारभार पारदर्शक केला असून नागरिकांना आता ग्रामपंचायतीची माहिती उपलब्ध होणार आहे. ग्रामपंचायत कोणताही खर्च सरपंच आणि
ग्रामसेवक दोघांच्या संयुक्त सहमतीशिवाय करू शकत नाही. यासाठी ई ग्राम स्वराज हे एक ऑनलाइन पोर्टल आहे जिथे गावाच्या आर्थिक प्रगतीची माहिती मिळते, जसे की कोणत्या आर्थिक वर्षात किती निधी आला आणि तो कुठे खर्च झाला. ग्रामपंचायत खर्चाचा हिशेब ई- ग्रामस्वराजवर पाहता येणार आहे. गावात काय काम सुरू? कुठवर आलं? हेही पाहता येणार आहे. ग्रामपंचायतीस कोणत्या योजनेतून किती निधी मिळतो याबाबतची माहिती उपलब्ध आहे. अगदी कुणालाही माहिती मिळेल, अशी सोय सरकारने केली आहे.
चौकट
ग्रामपंचायतींसाठी कुठून येतो निधी?
गावासाठी विविध योजनांमधून निधी येतो, जो केंद्र आणि राज्य सरकारकडून मिळतो. १५ व्या वित्त आयोगानुसार प्रत्येक व्यक्तीसाठी प्रति वर्षी ठराविक रक्कम गावांना मिळते, ज्याचा वापर पाणीपुरवठा, स्वच्छता आणि इतर कामांसाठी केला जातो. ग्रामपंचायतीला जमीन महसूल, कर (वाहने, उत्सव, टोल) आणि इतर स्थानिक स्रोतांकडूनही निधी मिळतो.
0 Comments