ग्रंथालय संचालक गाडेकर व सहकारी यांचा
सार्वजनिक ग्रंथालय पाहणी दौरा .पुरातून प्रवास ..
नांदेड(वृत्तसेवा):- नांदेड जिल्ह्यातील विविध तालुक्यात ढगफुटी मुळे अनेक शासनमान्य ग्रंथालयाचे नुकसान झाले .या ग्रंथालयांची पाहणी करण्याकरीता राज्याचे सन्माननीय ग्रंथालय संचालक अशोक गाडेकर यांनी जिल्ह्यातील हदगाव तालुक्यातील स्व.खासदार राजीव सातव साहेब यांच्या निधीतून बांधकाम झालेल्या ओमचंद्र सार्वजनिक वाचनालय, कंजारा ता. हदगाव या शासनमान्य या ग्रंथालयास भेट दिली .ग्रंथालयाची पाहणी केली असता अतोनात नुकसान झाले. त्यांच्या समवेत विभागाचे सहायक ग्रंथालय संचालक सुनील हुसे साहेब, जिल्हा ग्रंथालय अधिकारी अनिल सूर्यवंशी सर, प्रताप सूर्यवंशी , अनिलभाऊ बाविस्कर आदी उपस्थित होते या ग्रंथालयाचे नुकसान झालेले पाहिले असता सर्वांचे मन दुःखी झाले .
या गावातील ग्रंथालय पाहण्यासाठी जातांना लोखाडी नदीच्या पुलावरून पाणी वाहत होते .या पुराच्या पाण्यातून सर्व पायी निघाले .सोबतचा व्हिडीओ पाहिल्यावर लक्षात येईल की किती ढगफुटी झाली असेल. आजूबाजूचे अनेक गावे आज पण सावरलेलेले नाही. तिथे गेल्यावर वाचनालयाचे अध्यक्ष प्रल्हाद राव तगडपल्ले सर, सचिव चंद्रकांत तगडपल्ले सर, पोलिस पाटील , सरपंच, तसेच गावकरी यांनी सविस्तर माहिती सांगितली . शासन स्तरावर जी मदत करता येईल ती नक्कीच केली जाईल असे संचालक साहेब यांनी आश्वासीत केले. अतीवृष्टीमुळे नुकसान झालेल्या अशा सर्व ग्रंथालयास रॅक,व पुस्तके पुरवण्यात येईल असे सांगितले. आणि सर्वच शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांनी विमा नक्कीच काढावा असे गाडेकर यांनी आवाहन केले..यावेळी हदगाव तालुका ग्रंथालयाचे प्रतिनिधी तसेच सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष ग्रंथपाल उपस्थित होते..
0 Comments