जीआरमुळे भुजबळांचा विरोध म्हणजे फायदा- जरांगे पाटील
छत्रपती संभाजी नगर(कटूसत्य वृत्तसेवा ):-मनोज जगे पाटील यांच्या आंदोलनानंतर सरकारने हैद्राबाद गॅझेट संदर्भात जीआर काढला. वा जीनंतर जरांगे पाटील यांनी आपले उपोषण सोडले. मात्र, या जीआरचा मराठा समाजाला फायदा नाही, कुणबी प्रमाणपत्र मिळण्यासाठी जी प्रक्रिया होती तीच एका कागदावर उतरवून दिल्याचा आक्षेप घेण्यात येत होता. मात्र, सरकारच्या जीआरमुळे मराठवाडयातील सरसकट मराठा ओबीसीमध्ये गेल्याचा दावा मनोज जरांगे पाटील यांनी माध्यमांशी बोलताना केला आहे. ते म्हणाले, "मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या नव्या जीआरच्या आधारावर मराठा सरसकट ओबीसी आरक्षणात जाणार नसल्याचे म्हटले जात होते. तरी, हैदराबादच्या गॅझेटच्या माध्यमातून मराठवाडयातील मराठे सरसकट ओबीसी आरक्षणात जाणार आहेत.' 'जीआरमध्ये दुरुस्ती सुचविल्यास ती करून मिळणार असल्याचे आश्वासन राज्य सरकारने दिले आहे. तसेच आरक्षणाची प्रक्रिया कशी असेल, समाजबांधवांना प्रमाणको कधीपासून मिळणार, याबाबत सरकारसोबत चर्चा झाली आहे. अशी माहिती देखील जरांगे पाटील यांनी दिली.
भुजबळांचा विरोध म्हणजे फायदा या जीआरमुळे ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागेल असे छगन भुजबळ म्हणतायेत मात्र तसे होणार नाही. त्यांनी अनेक काळ सत्ता, मंत्रिपद भोगले आहे. ते विरोध करता आहेत याचा अर्थ याची अंमलबजावणी होणारच, हे बांधवांनी विचारात घ्यावे, असे देखील जरांगे पाटील यांनी सांगितले. तसेच मराठा समाज एकजुटीने शांततेच्या मार्गाने मुंबईला गेला आणि विजय घेऊनच परतला. महत्त्वाचे म्हणजे काही मराठे आपल्याला काऊंटर करतात, विरोधत करतात त्याचे कारण आपल्याला कळत नाही मात्र मराठा समाजाने हक्क मिळवला आहे, असे देखील त्यांनी सांगितले
0 Comments