विद्युत क्षेत्र तांत्रिक कामगार युनियनचा ४८ वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा.
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- महाराष्ट्र राज्यामध्ये वीज क्षेत्रात अग्रगण्य असणारी व महाराष्ट्र राज्यातील पहिली ISO:9001:2015 नामांकन प्राप्त असलेल्या विद्युत क्षेत्र तांत्रिक कामगार युनियन (१०२९) चा ४८ वा वर्धापन दिन महावितरण बिजली भवन, जुनीमिल गिरणी आवार, सोलापूर येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
याप्रसंगी पुणे प्रादेशिक संघटक तथा सोलापूर मंडळ अध्यक्ष सुनिल काळे यांच्या हस्ते वार्ताफलक पूजन करून मोठया उत्साहात वर्धापन दिन साजरा करण्यात आला.
यावेळी व्ही. एम. जगताप, अनिलकुमार बनसोडे, सुनिल काळे, दत्ता कांबळे, श्रीराम सलवदे, मयुर गवते, लक्ष्मीपुत्र बिराजदार, दत्तात्रय शिंदे, बालाजी वराडे, नरेंद्र सुवर्णकार, संजय फताटे, धनराज पारेकर, चंद्रकांत पवार, विजय काळे, दत्तात्रय वाघमारे, गुंडप्पा बनसोडे, संजय स्वामी, रविंद्र तुळजापूरकर, संतोष कुंभार यांच्यासह इतर सभासद उपस्थित होते.
वर्धापन दिन साजरा केल्यानंतर काही सभासदांनी डॉ. हेडगेवार रक्तपेढी संस्थेत रक्तदान केले.
0 Comments