Hot Posts

6/recent/ticker-posts

माजी आ.बबनदादा शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त अंजनगावात 50 जणांचे रक्तदान

 माजी आ.बबनदादा शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त अंजनगावात 50 जणांचे रक्तदान




माढा  (कटूसत्य वृत्त):-- पिंपळनेर येथील विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखा्याचे संस्थापक- चेअरमन माजी आमदार बबनराव शिंदे यांच्या 74 व्या वाढदिवसाचे औचित्य साधून अंजनगाव खेलोबा ता.माढा येथील शिवप्रेमी ग्रुप व रणजितसिंह (भैय्या) शिंदे मित्रमंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शिबिरामध्ये 50 जणांनी उस्फूर्तपणे रक्तदान केले.
    
या शिबिराचे उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेसचे माढा तालुका उपाध्यक्ष सज्जनराव जाधव व डीसीसी बँकेचे सेवानिवृत्त सिनिअर बँक इन्स्पेक्टर व्यंकटराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.रक्त संकलनाचे काम सोलापूर येथील अक्षय ब्लड बँकेने केले.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका उपाध्यक्ष सज्जनराव जाधव यांनी सांगितले की, माजी आमदार बबनराव शिंदे यांचा वाढदिवस माढा तालुका व विधानसभा मतदारसंघात गावोगावी रक्तदान शिबिराच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जपण्याच्या उद्देशाने साजरा केला जात आहे.ही बाब निश्चितच कौतुकास्पद व अनुकरणीय आहे.बबनदादांनी विविध विकासकामांच्या माध्यमातून माढा तालुक्याचे नंदनवन केले आहे त्यामुळे सर्वसामान्य जनता व शेतकऱ्यांचे त्यांच्यावर अपार प्रेम व श्रद्धा असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी माजी सरपंच भागवत चौगुले,उद्योजक पांडुरंग चौगुले, व्यंकटराव पाटील,प्रदिप चौगुले,राष्ट्रवादीचे सोशल मीडियाचे तालुकाध्यक्ष विनायक चौगुले,प्रा.विनायक जाधव,अंकुश लटके,सचिन चौगुले,रोहित लटके,शशिकांत देशमुख,शशांक पाटेकर, तुकाराम लटके,नानासाहेब वाघमोडे,बालाजी पाटील, नागनाथ कोळेकर,रवी काटे, दादा वाघमोडे,विठ्ठल कोळेकर, निलेश गडेकर,धनाजी देवकते यांच्यासह ग्रामस्थ व युवक उपस्थित होते.

फोटो ओळी- अंजनगाव खेलोबा ता.माढा येथील रक्तदान शिबिराच्या वेळी उपाध्यक्ष सज्जनराव जाधव,व्यंकटराव पाटील, उद्योजक पांडुरंग चौगुले व इतर मान्यवर.
Reactions

Post a Comment

0 Comments