Hot Posts

6/recent/ticker-posts

शिक्षण हे परिवर्तनाचे साधन – कॉ. तानाजी ठोंबरे

 शिक्षण हे परिवर्तनाचे साधन – कॉ. तानाजी ठोंबरे




कै. शंकरराव बाजीराव पाटील विद्यालय, अनगर येथे शिक्षक दिन समारंभ उत्साहात

अनगर (कटूसत्य वृत्त):- कै. शंकरराव बाजीराव पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, अनगर येथे शिक्षक दिन सोहळा उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्य सहकार परिषदेचे अध्यक्ष,माजी आमदार राजन पाटील होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून कॉ. तानाजी ठोंबरे (बार्शी) उपस्थित होते.

आपल्या भाषणात कॉ. ठोंबरे म्हणाले की, “शिक्षण हे समाज परिवर्तनाचे प्रभावी साधन आहे. मात्र आज त्याचे बाजारीकरण होत आहे. समाजातील गोरगरीब व वंचित घटकांपर्यंत दर्जेदार शिक्षण पोहचविण्याची जबाबदारी आपल्यावर आहे. राष्ट्र उभारणीसाठी शेतकरी, शिक्षक, विद्यार्थी व पालक यांनी एकत्रित प्रयत्न करणे काळाची गरज आहे.”
यावेळी माजी आमदार राजन पाटील म्हणाले की राष्ट्र उभारणीमध्ये शिक्षकांचे योगदान खूप मोठे आहे. म्हणून समाजातूनही शिक्षकांना सन्मान मिळाला पाहिजे या भावना व्यक्त करून सर्व शिक्षकांना शिक्षक दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य चंद्रकांत ढोले यांनी केले. सुरुवातीला भारतरत्न डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन लोकनेते बाबुरावअण्णा पाटील यांच्या प्रतिमांचे पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.



यावेळी अनगरसिद्ध शिक्षण प्रसारक मंडळ व अनगर परिसरातील जिल्हा परिषद शाळेतील सर्व शिक्षकांचा सन्मान लेखणी,डायरी व गुलाब पुष्प देऊन करण्यात आला आणि शिक्षकांविषयी कृतज्ञता व्यक्त  करण्यात आली. 


समारंभास निवृत्त मुख्याध्यापक बळीराम डोंगर , मुख्याध्यापक ब्रह्मदेव डोंगरे, पी ए पाटील, यादव सर, पाटील एस व्ही, पवार डी एल, बजरंग थिटे डॉ.संजय करंडे मुख्याध्यापक रामचंद्र पाटील, मुख्याध्यापक संजय डोंगरे, प्राचार्य पृथ्वीराज करंडे, मुख्याध्यापिका मनीषा गुंड, उपप्राचार्य महादेव चोपडे, पर्यवेक्षक माधव खरात यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. सत्यवान दाढे यांनी सूत्रसंचालन केले तर संजय डोंगरे यांनी आभार मानले.

Reactions

Post a Comment

0 Comments