Hot Posts

6/recent/ticker-posts

शेतक-यांना उबाठाच्या आमदार, खासदारांकडून अजून दमडीचीही मदत नाही

 शेतक-यांना उबाठाच्या आमदारखासदारांकडून अजून दमडीचीही मदत नाही


 

संजय राऊत,  मोर्चा काढण्यापूर्वी शेतक-यांना खिशातून मदत द्या

 

भाजपा माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन यांचा टोला

 

मराठवाड्यात तसेच अनेक जिल्ह्यांत अतिवृष्टीने शेतकऱ्यांची घरदारेपिके वाहून गेली. त्यांना मदतीची गरज आहे. या स्थितीत भाजपा - महायुती सरकार तत्परतेने धावून आले आहे. शेतक-यांच्या खात्यात पहिल्या टप्प्यातील मदत जमा देखील झाली आहेउर्वरित शेतक-यांनाही लवकरच मिळणार आहे. महायुतीच्या आमदार- खासदारांनी एक महिन्याचे वेतन पूरग्रस्त बळीराजासाठी दिले आहे. मात्र संजय राऊतउबाठा गटाने पूरग्रस्त शेतक-यांना दमडीचीही मदत केली नाही. 11 ऑक्टोबरला मोर्चा काढण्याची भाषा करणा-या श्री. राऊत यांनी मोर्चा काढण्याआधी किमान अर्धा किलो ज्वारी - तांदूळ तरी शेतकऱ्यांना द्यावी असा टोला भारतीय जनता पार्टीचे प्रदेश माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन यांनी शुक्रवारी लगावला. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. राज्य सरकारने शेतकऱ्यांना तातडीची मदत म्हणून सरसकट 5 हजार रोख ,35 किलो धान्य अशी मदत जाहीर केली आहे. शेतकऱ्यांना केंद्राकडूनही लवकरात लवकर भरघोस मदत मिळेलअसेही श्री. बन यांनी नमूद केले.
उद्धव ठाकरे यांनी केलेल्या “आमचे हात रिकामे” या वक्तव्यावर टीकेची झोड उठवत श्री. बन म्हणाले की तुमचे हात रिकामे कसे होमविआ सरकार असताना कोवीड काळातील भ्रष्टाचार आणि अनेक घोटाळ्यांतून साडेनऊ लाख कोटी आपल्या तिजोरीत तुम्ही भरले आहेत. त्यातील 20 हजार कोटींची मदत तरी राऊत आणि उबाठा गटाने शेतक-यांना द्यायला हवी होती. नौंटंकी करत मोर्चा काढण्याऐवजी शेतक-यांना मदत करा असे आव्हान श्री. बन यांनी दिले.
श्री. राऊत यांच्या “शेतकरी सरकारला गावात येऊ देणार नाहीत.” या टीकेवर पलटवार करत श्री. बन म्हणाले कीपाहणी दौ-याचा देखावा करणा-या श्री. राऊत यांनाच शेतकरी गावात येऊ देणार नाहीत. भाजपा- महायुती सरकार मदत करणारे सरकार आहेहे त्यांना ठाऊक आहे असेही ते म्हणाले.
निकष विसराफोटो पुरेसा – देवाभाऊंचे शेतकरीपूरक निर्णय
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार कोणतेही निकष न लावतापंचनाम्याची गरज नाही केवळ नुकसानीची छायाचित्रे असली तरी शेतक-यांना मदत मिळणार आहे. सरकारची तिजोरी शेतक-यांसाठी खुली आहे. आपत्कालीन परिस्थितीचे गांभीर्य सांगून केंद्राकडून अधिकाधिक मदत मिळवण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र दुसरीकडे शेतक-यांप्रति कोरडे उमाळे दाटून आणणे याऊपर काहीही राऊत आणि उबाठा गटाने केले नाही अशी जोरदार टीका श्री.बन यांनी केली.
Reactions

Post a Comment

0 Comments