Hot Posts

6/recent/ticker-posts

जेष्ठ समाजसेवक डॉ.बाबा आढाव होणार सत्यशोधक शिक्षक पुरस्काराने सन्मानित !!!

 जेष्ठ समाजसेवक डॉ.बाबा आढाव होणार सत्यशोधक शिक्षक पुरस्काराने सन्मानित !!!



पुणे - शाक्त शिवराज्याभिषेक, सत्यशोधक समाज स्थापना दिन व संविधानाचे अमृत महोत्सवी वर्ष सोहळा समिती, पुणे चे वतीने रविवार दि.२८.९.२०२५ रोजी श्री.शिवाजी मराठा सोसायटीच्या श्रीमंत श्री.खासेसाहेब पवार सभागृहात जेष्ठ समाजसेवक डॉ.बाबा आढाव सत्यशोधक शिक्षक पुरस्काराने जेष्ठ सत्यशोधक उत्तमराव (नाना) पाटील ,तरवडी यांचे शुभहस्ते सन्मानित होणार आहेत. यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून सेवा निवृत्त आययेएस अधिकारी महेश झगडे , अध्यक्ष म्हणून शेतकरी उधोजक राजकुमार धुरगुडे आणि स्वागताध्यक्ष म्हणून श्री.शिवाजी मराठा सोसायटीचे सचिव अण्णासाहेब थोरात तसेच प्रमुख पाहुणे म्हणून सामजिक कार्यकर्त्या अबेदा इनामदार ,माजी महापौर वैशाली बनकर ,कमल व्यवहारे उपस्थित रहाणार आहेत. तर विशेष अथिती म्हणून   कुलपती शिवाजीराव कदम ,पुणे जिल्हा मंडळ सचिव संदीप कदम ,अ.भा.मराठा शिक्षण परिषद चे सचिव सौ.प्रमिलाताई गायकवाड ,अभिनव शिक्षण संस्थेचे राजीव जगताप ,मराठवाडा मित्र मंडळ शिक्षण संस्थेचे डॉ.भाऊसाहेब जाधव ,काकडे शिक्षण संस्थेचे कवी,लेखक प्रा.शरदचंद्र काकडे ,लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे वंशज विलास साठे ,उद्योजक किरण इंगोले ,आर्किटेक्ट मारुतीराव जाधव देखील उपस्थितीत रहाणार आहेत.
या कार्यक्रमात वैचारिक संवाद सत्रात उद्घाटक म्हणून बारामती प्रणाली शिक्षण संस्थेचे बुवासाहेब हुंबरे व अध्यक्ष म्हणून संयोजक सत्यशोधक समाज संघाचे अरविंद खैरनार असणार आहेत आणि कुळवाडीभूषण छत्रपती शिवरायांना शाक्त राज्यभिषेककाची आवश्यकता का वाटली आणि यातून शेतकरी कष्टकरी जनतेने काय प्रेरणा घ्यावी यावर शिवचरित्राचे अभ्यासक शिवश्री.गंगाधर बनबरे आणि सत्यशोधक समाज स्थापना करण्यामागील महात्मा फुले यांची भूमिका व वर्तमान परिस्थितीत सत्यशोधक समाजाची गरज यावर सत्यशोधक विचारवंत कॉ.किशोर ढमाले मौलिक विचार मांडणार आहेत . तर विशेष सत्रात संविधान संस्कृती व बहुजन क्रांती यावर संभाजी ब्रिगेड चे प्रदेशाध्यक्ष प्रवीणदादा गायकवाड संवादक म्हणून बोलणार असून यावेळी अध्यक्ष म्हणून सिने अभिनेते ,विचारवंत किरण माने उपस्थीत रहाणार आहेत.
या कार्यक्रमात विविध संघटना व त्यांचे प्रतिनिधी सहभाग घेणार असून ते समाज परिवर्तनासाठी कशा पद्धीतीने काम करीत असून यापुढे सत्यशोधक कार्याचा वसा म्हणजे योग्य कृती आराखडा पुढे घेऊन जाण्यासाठी काय करणार , तसेच महात्मा फुले यांची २०० वी जयंती वर्ष देशाला महत्वाची कशी ठरेल या दृस्ठीने विचार मांडणार आहेत.
याप्रसंगी कार्यक्रमाचे स्वागतगीत राखी रासकर व कवी बाबासाहेब जाधव आणि त्यांची टीम गाणार असून कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.प्रतिमा परदेशी,अप्पासाहेब गायकवाड ,लेखक प्रा.उद्धव कोळपे ,प्रा.अमृतराव काळोखे  व सूत्रसंचालन पत्रकार मुकुंद काकडे,अँड.नीरज धुमाळ ,मोहिनी कारंडे,प्रा.संजयकुमार कांबळे आणि आभार डॉ.प्रा.दत्ताजीराव जाधव,अंजुम इनामदार ,शिवाजी लोखंडे ,रघुनाथ ढोक  मानणार आहेत. शेवटी ठरावाचे वाचन देखील केले जाणार आहे. तरी या कार्यक्रमासाठी सत्यशोधक तथा  शिव फुले शाहू आंबेडकरी चळवळीच्या कार्यकर्त्यांनी जास्तीतजास्त उपस्थितीत रहावे असे आवाहन दि.२५ सप्टेंबर रोजी दुपारी १.३० वाजता  पत्रकार परिषदेमध्ये शाक्त शिवराज्याभिषेक, सत्यशोधक समाज स्थापना दिन व संविधानाचे अमृत महोत्सवी वर्ष सोहळा समिती, पुणे चे वतीने करण्यात आले आहे.
Reactions

Post a Comment

0 Comments