आदिला नदी : जुन्या नदीची नव्यानं ओळख!
शहरातील शाळांमधून सुरू करण्यात येणार जनजागृती उपक्रम
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- यावर्षीच्या पावसाळ्याने पुनरुज्जीवित झालेल्या आदिला नदीला नवजीवन देण्यासाठी ‘आदिला नदी : जुन्या नदीची नव्यानं ओळख’ या जनजागृती उपक्रमाची शास्त्रीनगरमधील श्री समर्थ विद्यामंदिर येथून या उपक्रमाची सुरूवात झाली.
नदीचे ऐतिहासिक व पर्यावरणीय महत्त्व, पूर- महापूर, ढगफुटी सारख्या नैसर्गिक घटनांमागील कारणे तसेच नदी परिसर संवर्धनासाठी करता येणाऱ्या उपाययोजनांबाबत आदिला नदी व परिसर संवर्धन कृती समितीचे राजकिरण चव्हाण यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
‘आदिला नदी व परिसर संवर्धन कृती समिती’च्या माध्यमातून इतिहास जपण्याबरोबरच समाजामध्ये जनजागृती शाळा पातळीवरूनच होण्यासाठी विशेष भर देण्यात आला.
शहरातील प्रत्येक शाळेतून नदी व परिसर संवर्धनाची जाणीव पोहोचविण्याचे आवाहन समितीच्या वतीने करण्यात आले असून, या मोहिमेला व्यापक जनसमर्थन लाभेल असा विश्वास व्यक्त करण्यात आला. सोलापुरातील आदिला नदीचे नाव सर्वदूर पोहोचावे, तसेच परिसर संवर्धन आणि सुशिक्षित नागरिक निर्मितीसाठी सर्वांनी एकत्र यावे, असे आवाहनही या निमित्ताने राजकिरण चव्हाण यांनी केले.
या कार्यक्रमाला शाळेचे अध्यक्ष रवींद्रकुमार शिखरे, सचिव अरुण शिखरे, मुख्याध्यापिका सुधा शिखरे यांच्यासह मंजुषा मुळे, महादेव चौरे, परमेश्वर कलशेट्टी, श्रुती शिखरे, रुथम्मा भंडारे, वर्षा शेळके, ओमश्री चित्रावकर आदी शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 Comments