Hot Posts

6/recent/ticker-posts

राजकुमार हिवरकर पाटील यांच्या पाठपुराव्याला यश

 राजकुमार हिवरकर पाटील यांच्या पाठपुराव्याला यश




 अकलूज एसटी डेपोला नवीन १० लालपरी

नातेपुते (कटूसत्य वृत्त):- शिवसेनेचे ओबीसीचे जिल्हा प्रमुख राजकुमार हिवरकर पाटील यांनी १५ फेबुवारी २०२५ रोजी
 महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे मंत्री भरतशेठ गोगावले यांच्या माध्यमातून
 अकलूज बस डेपो साठी २० एसटी बसची मागणी केली होती त्या मागणीला यश आले असुन अकलूज एसटी डेपोला सध्या तरी नवीन १० लालपरी एस बस मिळाल्या असुन त्या बसचे पूजन शिवसेना ओबीसीचे जिल्हाप्रमुख राजकुमार हिवरकर पाटील यांच्या शुभहस्ते पार पडले यावेळी शिवसेनेचे नेते पदाधिकारी त्याचबरोबर ज्यांच्या जीवावर एसटी महामंडळाच्या अकलूज बस डेपोची धुरा आहे असे सर्व कर्मचारी वृंद यावेळी उपस्थित होते.अकलूज बस डेपोच्या ताब्यात दहा नवीन एसटी बस दाखल करून दिल्याबद्दल शिवसेना ओबीसीचे जिल्हाप्रमुख राजकुमार हिवरकर पाटील यांनी महायुती सरकारचे विशेषता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री तथा शिवसेना मुख्य नेते  एकनाथराव शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, रोजगार हमी मंत्री भरत शेठ गोगावले यांचे आभार मानले. व उर्वरित राहिलेले १० बसेस लवकरात लवकर अकलूज डेपोसाठी मिळाव्या यासाठी विनंती केली आहे.


चौकटीत :
अकलूज बस डेपोच्या जुन्या झालेल्या जवळपास ४० बसेस आहेत पूर्वी त्या १०० वर होत्या बस ची संख्या कमी झाल्याने विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी खेड्या गावावरून येण्यास तसेच हॉस्पिटलच्या निमित्ताने जाणाऱ्या महिलांची संख्या खूप मोठी आसल्याने अडचण निर्माण झालेली होती. त्याचबरोबर माळशिरस तालुक्याच्या जवळ पंढरपूर,तीर्थक्षेत्र अक्कलकोट, गोंदावले, शिर्डी, शिखर शिंगणापूर, शनिशिंगणापूर, नाशिक, त्रिंबकेश्वर,आधी धार्मिक स्थळांना भेटी देण्यासाठी नागरिकांना उपलब्ध नसल्याने यापूर्वी जाणे शक्य होत नव्हतं सदर निवेदनाचा विचार सकारात्मक व तात्काळ करून भरत शेठ गोगावले मंत्री रोजगार हमी पणन यांच्या माध्यमातून राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी तात्काळ दहा बस पाठवून उर्वरित दहा बस द्याव्या याबाबतची विनंती मंत्री महोदयांकडे पुन्हा करण्यात आली.

 राजकुमार हिवरकर पाटील

(शिवसेनेचे ओबीसीचे जिल्हा प्रमुख)
Reactions

Post a Comment

0 Comments