परिणय फुके पावसाळ्यातील बेडूक, फडणवीसांनी शेपूट धरल्यावर भुंकतो'
मनोज जरांगेंची जहरी टीका
मराठा आरक्षणासाठी संघर्ष करणारे मनोज जरांगे पाटील यांची टीकेची धार दिवसेंदिवस वाढू लागली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे त्यांच्या टीकेचे लक्ष आहेत.
थेट ऐकरी भाषेत टीका सुरू केली आहे.
मुख्यमंत्री फडणवीस यांची बाजू घेणाऱ्या भाजप नेते, आमदार अन् मंत्र्यांना देखील सुनावण्यास जरांगे पाटील मागे पुढे पाहत नाहीत. आमदार परिणय फुकेंना यातून जरांगे पाटील यांनी जोरदार लक्ष्य केलं आहे.
मनोज जरांगे पाटील यांनी परिणय फुकेंवर टीका करताना, 'पावसाळ्यातील बेडूक' म्हणताना, फडणवीसांच्या हातात शेपटू असलेले म्हटलं आहे. जरांगे पाटील यांची ही जहरी टीका चर्चेत आली आहे. जरांगे पाटलांच्या या टीकेमुळे भाजप आक्रमक होण्याची शक्यता आहे.
मनोज जरांगे पाटलांनी परिणय फुकेंवर टीका करताना म्हटले आहे की, "पावसाळ्यातील बेडूक आहे. फडणवीस शेपूट धरील तसेच बोलणार, कुत्र्याचा शेपूट वाकडं असतं, ते फडणवीसांनी शेपूट धरले असेल वरून, म्हणून लागलं भुंकायला. कशाला काय किंमत द्यायची. स्वतःच्या लायकीने बोलायला पाहिजे".
'फडणवीस यांना दम निघत नाही, त्याचा मराठा द्वेष उफाळून येतो. मराठा-ओबीसीमध्ये वाद करून, दंगली लावायच्या हे त्याच्या हिताचे नाही. मराठ्यांना फडणवीसाने हलक्यात घेऊ नये. मराठ्यांच्या नादी लागल्यास, देशातलं सरकार देखील अडचणीत येणार, माझ्या तर अजिबात नादी लागू नका', असा इशारा देखील जरांगे पाटील यांनी दिला.
'फडणवीसांनी सांगितल्याशिवाय यांचं बोलण्याच टप्पर नाही. दंगल किंवा काही अडचणी घडल्या, तर त्याला फडणवीस जबाबदार असतात.आमच्या सोबतचे कोणीही दंगल करणार नाहीत, जाळपोळ करणार नाही, तोडफोड करणार नाहीत. मात्र मुंबईत जाणार, तुमच्या नाकावर टिचून मुंबईत जाणार', असे ठामपणे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले.
पोलिस म्हणजे फडणवीस अन् फडणवीस म्हणजे पोलिस हे समीकरण आहे. शांततेत बसलो होतो, उपोषण सुरू होतं तरी आमच्या डोक्याच्या चिंधड्या केल्या, म्हणून का शंका घेऊ नये, पोरांनी काही न करून ही फडणवीस यांनी केसेस केल्याची आठवण जरांगे पाटील यांनी सांगितली.
'बार-बार मार खायला आम्ही जन्म घेतलेला नाही. तुमची चाल आम्हाला चांगली कळते. ज्या अर्थी हे लोक बोलत आहेत, याचा अर्थ फडणवीस यांनी चांगल्या प्रकारे कट शिजवून ठेवलेला आहे. मात्र कट उधळायची ताकद मराठ्यांमध्ये आहे मुंबईत मराठेच दिसणारच', असा विश्वास जरांगे पाटील यांनी व्यक्त केला.
फोटो मधील लोगो काढा....
0 Comments