29 ऑगस्टला विजयाचं गुलाल उडवणार, आरक्षण मिळवणार,"
मराठा आंदोलनात दंगल घडवण्याचा कट? - जरांगे पाटील
मुंबई (कटूसत्य वृत्त):- राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी ही घोषणा केली..आणि साऱ्या राज्याचं लक्ष वेधलं ते गोव्यातल्या ओबीसी महासंघाच्या अधिवेशनानं...मात्र त्यानंतर आता हेच ओबीसी अधिवेशन दुसऱ्याच कारणासाठी वादात सापडलंय.
काऱण मराठा आंदोलक मनोज जरांगेंनी ओबीसी महासंघाच्या अधिवेशनात मराठा आंदोलनात दंगल घडवण्याचा कट रचला गेला, असा आरोप केलाय. इतकचं काय तर आंदोलनात काही घडल्यास थेट फडणवीसचं जबाबदार असतील, असंही जरांगे म्हणालेत.. तर दुसरीकडे जरांगेंनी केलेले आरोप ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष बबनराव तायवाडे यांनी फेटाळलेत.
दरम्यान 29 ऑगस्टला मनोज जरांगे पाटील मराठा समाजाच्या मागण्यासाठी मुंबईत आंदोलन करणार आहेत. या आंदोलनात जरांगेंच्या कोणत्या मागण्यात आहेत पाहूयात..
मराठा कुणबी एक असल्याचा जीआर काढा
हैदराबादसह सातारा आणि बॉम्बे गॅझेट लागू करा
आरक्षणासाठी सगेसोयरे अधिसूचनेची अंमलबजावणी करा
मराठा आरक्षणाच्या काळात दाखल झालेले गुन्हे मागे घ्या
मराठा आरक्षणासाठी बलिदान देणाऱ्याच्या वारसांना नोकरी द्या
मराठा आरक्षणासह इतर मागण्यासाठी जरांगे मुंबईत धडकणार आहेत. त्याआधीच जरांगेंनी ओबीसींना टार्गेट केलयं. त्यामुळे ओबीसी महासंघावर जरांगेंनी आरोप केल्यानं मराठा विरुद्ध ओबीसी असा संघर्ष पुन्हा पेटणार का? जरांगेंच्या मागण्या सरकार मान्य करणार का? जरांगेंच्या आंदोलनावर सरकार तोडगा काढणार की जरांगेंच्या मोर्चानं सत्ताधाऱ्यांची पुन्हा कोंडी होणार? याकडे अनेकांचे लक्ष लागलय.
"मराठ्यांच्या नादी लागू नका, अन्यथा सरकारलाच अडचणीत आणाल", असा थेट इशारा मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिला आहे.
आमदार परिणय फुके यांच्या टीकेच्या पार्श्वभूमीवर जरांगे पाटील यांनी अंकूशनगर येथील निवासस्थानी आज दुपारी माध्यमांशी संवाद साधला.
चार दिवसांच्या परभणी, नांदेड, हिंगोली आणि लातूर दौऱ्यापूर्वी बोलताना जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री फडणवीसांवर जातीयवादाचा आरोप केला. "मराठा-ओबीसी वाद वाढवणे राज्याच्या प्रमुखांना शोभत नाही. मराठ्यांना कमी लेखू नका. माझ्या नादी लागण्याचा प्रयत्नही करू नका," असा इशारा त्यांनी दिला.
गणपती मिरवणुकीतून आंदोलनाचा संदेश
जरांगे पाटील यांनी जाहीर केलं की 27 ऑगस्ट रोजी मराठा समाज गणपती बाप्पाला घेऊन मुंबईत भव्य मिरवणूक काढणार आणि समुद्रात विसर्जन करणार. "आमची मुंबई, आमचा समुद्र आणि आमची संस्कृती, यावर कुणाचंही बंधन चालणार नाही. ही मिरवणूक विक्रमी ठरणार आहे," असं त्यांनी सांगितलं.
आरक्षणासाठी लढा सुरूच
मराठा समाजाला ओबीसी आरक्षण मिळावे यासाठीचा संघर्ष सुरू असल्याचं सांगत जरांगे पाटील म्हणाले, "मुंबईत एकाही आंदोलकावर पोलिसांनी लाठीचार्ज केल्यास मराठा समाज आणि तुम्ही आमनेसामने उभे राहाल. 29 ऑगस्टला विजयाचं गुलाल उडवणार, आरक्षण मिळवणार," असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
0 Comments