१९६७ ते २०२५ पर्यंत सेवानिवृत्त झालेल्या शिक्षकांचे निवडश्रेणी साठी जेष्ठता यादी तयार करणार- कादर शेख
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सोलापूर जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षण विभागातून १९६७ ते २०२५ या वर्षात सेवानिवृत्त झालेल्या शिक्षकांना निवडश्रेणी देण्यासाठी सेवाजेष्ठता यादी तयार करण्यात येईल असे शिक्षणाधिकारी कादर शेख यांनी सेवानिवृत्त शिक्षक संघटनेच्या पदाधीकार्यानां सांगीतले.
सोलापूर जिल्हा सेवानिवृत्त शिक्षक संघटनेच्या वतीने जिल्ह्यातील १९६७ ते २०२५ या काळात सेवानिवृत्त झालेल्या शिक्षकांना शासनाच्या ४ एप्रिल १९९० च्या आदेशानुसार पात्र शिक्षकांना त्रिस्तरीय चटोपाध्याय वेतनश्रेणी मधील *निवडश्रेणी* देण्यासाठी वर्षाला पात्र शिक्षकांच्या २०℅ प्रमाणात सेवाजेष्ठता यादी तयार करण्यात यावी यासाठी सोलापूर जिल्हा सेवानिवृत्त शिक्षक संघटनेच्या वतीने शिक्षणाधिकारी कादर शेख यांना भेटून निवेदन दिले या वेळी पुणे विभागीय अध्यक्ष सिध्देश्वर धसाडे, जिल्हा सेवानिवृत्त शिक्षक संघटना अध्यक्ष सुभाष फुलारी, सरचिटणीस मल्लीकार्जून बडदाळजिल्हा कार्याध्यक्ष काळप्पा सुतार, उत्तर सोलापूर अध्यक्ष सिद्राम जिरगे , जेष्ठ मार्गदर्शक शिवशंकर विजापूरे, नितीन कुलकर्णी, मल्लीकार्जून शेगाव शहापुरे आदी उपस्थित होते.
या पूर्वी कांही ठराविक शिक्षक प्रस्ताव दाखल केले त्यानाच निवडश्रेणी देण्यात आली आहे त्रिस्तरीय चटोपाध्याय निवडश्रेणी सन १९८६ पासून मंजूर आहे दरवर्षी २०℅ प्रमाणात ३९ वर्षाचे देणे बाकी आहे निवडश्रेणीस पात्र ठरलेला शिक्षकांचा सेवाजेष्ठता यादी तयार करून ३९ वर्षाचे अनुशेष भरून काढण्यात यावी असे मागणी करण्यात आली आहे.
0 Comments