मराठा समाजाचा रविवारी वधू-वर परिचय मेळावा
सेवा संघाचा उपक्रम: यंदाचा 31 वा मेळावा
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- मराठा सेवा संघ संचलित मराठा वधू- वर परिचय व सामुदायिक विवाह कक्षाच्या वतीने रविवार दि.24 ऑगस्ट रोजी मराठा वधू वर परिचय मेळाव्याचे आयोजन केले असल्याची माहिती मराठा सेवा संघाचे पुणे विभागीय अध्यक्ष प्रशांत पाटील, जिल्हाध्यक्ष डॉ. जी.के देशमुख यांनी दिली.
मराठा सेवा संघाच्या वधू वर परिचय मेळाव्याचे यंदाचे 31 व वर्ष आहे. प्रति वर्षाप्रमाणे यंदा वधू -वर परिचय मेळाव्याचे आयोजन केले आहे. रविवार दि. 24 ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजता आदित्य नगर येथील आदित्य संस्कृतिक भवन मध्ये वधू वर परिचय मेळावा पार पडणार आहे. मनुष्य जीवनातील विवाह संस्थेला अन्यसाधारण महत्व आहे. समाज प्रबोधनातून सहभागातून ती भक्कम करण्यासाठी व विवाह संस्था बळकट व्हावी यासाठी मराठा सेवा संघाच्यावतीने प्रतिवर्षी वधू -वर परिचय मेळाव्याचे आयोजन केले जाते. यंदाच्या वधू-वर मेळाव्याची नोंदणी देखील चालू झाली आहे. नोंदणीला मोठा प्रतिसाद मिळत आहे. शहराच्या विविध भागात ग्रामीण भागांमध्ये वधू- वर कक्षाच्या वतीने विविध बैठका घेऊन मेळाव्याची माहिती समाज बांधवा पर्यंत पोहचवली जात आहे. नियोजनाच्या बैठका देखिल पार पडल्या आहेत.
तरी इच्छुक वधू वरच्या पालकांनी वधू-वर परिचय मेळाव्यामध्ये सहभागी होऊन मेळाव्याचा लाभ घ्यावा असे आवाहन संयोजकाच्या वतीने केले आहे.
यासाठी जिल्हा वधू वर कक्षाचे जिल्हाध्यक्ष अंबादास सपकाळे, सदाशिव पवार, राम माने, सूर्यकांत पाटील, प्रकाश ननवरे, लक्ष्मण महाडिक, आर पी पाटील, नवनाथ कदम, राजू व्यवहारे, प्रकाश डोंगरे, गोवर्धन गुुंड इत्यादी परिश्रम घेत आहेत.
0 Comments