पापरी शाळेचे काम पुर्णत्वाकडे, सिईओ कुलदीप जंगम यांचे कडून पाहणी
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- मोहोळ तालुक्यातील पापरी येथे 2 कोटी रूपये खर्चून सुरू असलेले 12 वर्ग खोल्याचे काम पुर्णत्वास जात आहे. या समग्र शिक्षा अभियानातील वर्ग खोल्याचे कामांची पाहणी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी केली.
या प्रसंगी समग्र शिक्षा अभियान चे कार्यकारी अभियंता सुनील कटकधोंड, मुख्याध्यापक आबा टेकाळे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष राजेंद्र शेळके, उपाध्यक्ष नितीन भोसले, शिक्षण प्रेमी पद्माकर भोसले, माजी सरपंच सौदागर खडके उपस्थित होते.
मोहोळ तालुक्यातील पापरी येथे जिल्हा परिषदेच्या समग्र शिक्षा अभियानातून १२ शाळा खोल्याचे काम सुरू आहे. जिल्हा परिषदेचा मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून पदभार घेतले नंतर सिईओ कुलदीप जंगम यांनी या शाळेच्या पायाची पाहणी केली होती. आज पुर्णत्वाकडे जात असलेले काम पाहून समाधान व्यक्त केले.
*शाळेची उर्वरीत कामे वेळेत पुर्ण करा- सिईओ कुलदीप जंगम*
……………..
जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची कामे वेळेत पुर्ण करा. अशा सुचना सिईओ कुलदीप जंगम यांनी ठेकेदार व मुख्याध्यापक यांना दिल्या. कामा बरोबर विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेकडे देखील लक्ष द्या अशा सुचना केल्या.
0 Comments