सोलापूर महापालिकेची मालमत्ता कर थकबाकीदारांसाठी मोठी सवलत - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, August 21, 2025

सोलापूर महापालिकेची मालमत्ता कर थकबाकीदारांसाठी मोठी सवलत

 सोलापूर महापालिकेची मालमत्ता कर थकबाकीदारांसाठी मोठी सवलत



सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने नागरिकांसाठी मोठा दिलासा देणारा निर्णय घेण्यात आला आहे.

दि. १ सप्टेंबर ते ३० सप्टेंबर २०२५ या कालावधीत “विशेष मालमत्ता कर अभय योजना” राबविण्यात येणार असून या योजनेअंतर्गत थकबाकीदारांना त्यांच्या मालमत्ता करावरील व्याज व दंडात १०० टक्के सूट देण्यात येणार आहे.म्हणजेच नागरिकांनी केवळ मूळ कराची रक्कम भरल्यास व्याज व दंड पूर्णपणे माफ करण्यात येईल.



या योजनेमुळे थकबाकीदारांना मोठा दिलासा मिळणार असून, कर वसुलीतून महापालिकेच्या विकासकामांना गती मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.

महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओंबासे यांनी सांगितले की, “नागरिकांनी या सुवर्णसंधीचा लाभ घेत तातडीने थकबाकी भरावी. वेळेवर कर भरणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. कर वसुलीतूनच शहरातील पायाभूत सुविधा, स्वच्छता आणि विकासकामे उभारली जातात.

त्यामुळे या योजनेला मोठ्या संख्येने प्रतिसाद मिळेल असा विश्वास आहे.”या योजनेअंतर्गत कर भरण्यासाठी सर्व कर संकलन केंद्रांबरोबरच PhonePe, Paytm तसेच ऑनलाइन प्रणालीचा उपयोग करता येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.



👉 योजनेचा कालावधी : १ सप्टेंबर २०२५ ते ३० सप्टेंबर २०२५
 👉 सवलत : व्याज व दंड १००% माफ –

केवळ मूळ मालमत्ता कर जमा करावा लागेल.

महापालिकेच्या या निर्णयामुळे अनेक थकबाकीदारांना दिलासा मिळणार असून, विकासाच्या गतीला चालना मिळेल अशी अपेक्षा आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages