Hot Posts

6/recent/ticker-posts

सुनील कटकधोंड यांची धाराशिव जिल्हा परिषदेत कार्यकारी अभियंता पदावर पदोन्नतीने बदली

 सुनील कटकधोंड यांची धाराशिव जिल्हा परिषदेत कार्यकारी अभियंता पदावर पदोन्नतीने बदली


सोलापूर (कटूसत्य वृत्त):- जिल्हा परिषदेचे उप कार्यकारी अभियंता सुनील कटकधोंड यांची धाराशिव जिल्हा परिषदेत कार्यकारी अभियंता पदावर पदोन्नतीने बदली झाली आहे. 
सोलापूर जिल्हा परिषदेत ते उप कार्यकारी अभियंता या पदावर कार्यरत होते. उप अभियंता पदवीधर (स्थापत्य ) या पदावरून कार्यकारी अभियंता ( स्थापत्य)  या पदावर बदली झाली आहे. या बद्दल मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, अतिरिक्त सिईओ संदीप कोहिणकर यांनी अभिनंदन केले आह. 
सुनील कटकधोंड यांनी उप अभियंता या पदावर असताना ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता म्हणून देखील पदभार सांभाळला आहे. तसेच कार्यकारी अभियंता बांधकाम १ , कार्यकारी अभियंता समग्र शिक्षा अभियान या पदावर दिर्घकाळ पदभार सांभाळून काम केले आहे. अनेक शाळा खोल्यांची कामे त्यांनी पुर्ण केली आहेत. 
दिर्घकाळ प्रशानातील अनुभवामुळे सोलापूर जिल्हा परिषदेस त्यांचे सेवेचा उपयोग झाला आहे. 
उत्तर सोलापूर तालुक्यातील नान्नज चे सुपुत्र असलेले सुनील कटकधोंड यांना पदोन्नतीने कार्यकारी अभियंता या पदावर  नियुक्ती झालेमुळे अभियंता संवर्गाबरोबर विविध संघटनांनी तसेच कार्यकारी अभियंता संजय धनशेट्टी यांनी अभिनंदन केले आहे.
Reactions

Post a Comment

0 Comments