Hot Posts

6/recent/ticker-posts

साेलापूरमध्ये जिल्ह्यातील आराेग्य कर्मचाऱ्यांचे आंदाेलन सुरुच

 साेलापूरमध्ये जिल्ह्यातील आराेग्य कर्मचाऱ्यांचे आंदाेलन सुरुच




सोलापूर (कटूसत्य वृत्त):- राष्ट्रीय आरोग्य अभियान अधिकारी व कर्मचारी एकत्रीकरण समितीच्या वतीने पूनम गेटसमोर बेमुदत आंदोलन सुरूच आहे. समितीच्या पदाधिकाऱ्यांनी मंगळवारपासून (ता. १९) आंदोलन सुरू केले आहे.

या समितीच्या पदाधिकाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी हे आंदोलन सुरू केले आहे.

दहा वर्षे सेवा पूर्ण झालेल्या कर्मचाऱ्यांचे १०० टक्के समायोजन केले जावे, प्रत्येक वर्षी ३० टक्केप्रमाणे सेवा समाविष्ट करण्याचे धोरण ठरावे. कंत्राटी कर्मचाऱ्यांचे समावेशन करण्यासाठी शासनाने मान्यता दिली आहे, पण प्रत्यक्षात अंमलबजावणी झाली नाही. त्यांना महाराष्ट्र नागरी सेवा नियम लागू करावेत. त्यांना अन्य शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे सर्व प्रकारचे लाभ दिले जावेत. कर्मचारी संघटनांनी २०२३ मध्ये आंदोलन केले होते,

त्या आंदोलनात गुन्हे दाखल झालेल्या कर्मचाऱ्यांवरील गुन्हे मागे घ्यावेत. आयुष, प्रधानमंत्री मातृवंदना, एचबीटी या उपक्रमांतील सर्व कर्मचाऱ्यांचे समावेशन करावे. केंद्राच्या सूचनांप्रमाणे समुदाय आरोग्य अधिकारी यांचा सेवा कालावधी सहा वर्षे पूर्ण झाल्यानंतर कंत्राटी सेवा नियमित करण्याचा निर्णय लागू करावा. ज्या कर्मचाऱ्यांचे समावेशन करण्यासाठी पद नसेल तर आकृतिबंधात सुधारणा करून त्यांना समाविष्ट करावे. कंत्राटी आयुष अधिकाऱ्यांचे गट 'ब' वैद्यकीय अधिकारी म्हणून समावेशन करावे. अन्य कमी कालावधीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सरसकट १० टक्के वार्षिक वाढ करावी. कर्मचाऱ्यांना विमा संरक्षण सुविधा उपलब्ध करून द्यावी. कर्मचाऱ्यांना विनंती बदलीची संधी द्यावी, आदी मागण्या मांडण्यात आल्या आहेत.

मागील काही दिवसांपासून आंदोलन केले जात आहे, तरी शासनाने अद्याप या मागण्यांची दखल घेतली नाही. संघटनेचे राज्य समन्वयक कृष्णा माने, डॉ. रोहन वायचाळ, सुवर्णा गोडसे, सचिन क्षीरसागर, वंदना भगरे व प्रतिभा पाटील यांनी आंदोलनस्थळी ठाण मांडले आहे.

Reactions

Post a Comment

0 Comments