ग्रामीण फोटोग्राफर असोसिएशनच्या वतीने फोटोग्राफर दिंडी उत्साहात
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- जागतिक फोटोग्राफर दिनानिमित्त ग्रामीण फोटोग्राफर असोसिएशनच्या वतीने मंगळवारी फोटोग्राफर दिंडी उत्साही वातावरणात काढण्यात आली. पालखीमध्ये कॅमेरा ठेवून करण्यात आले. टाळ मृदंगाच्या निनादात वारकऱ्यांसह फोटोग्राफर्स या दिंडीत सहभागी झाले होते. प्रथमच अशा पद्धतीने अभिनव उपक्रम राबविण्यात आला.
प्रारंभी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर आणि चार हुतात्मा यांच्या पुतळ्यास मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर पालखी मधील कॅमेऱ्याचे पूजन करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सोलापूर श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष अध्यक्ष विक्रम खेलबुडे, महापालिका पत्रकार संघाचे अध्यक्ष किरण बनसोडे, कीर्तनकार ह.भ.प.सूर्याजी भोसले महाराज पंढरपूर , सोलापूर डिजिटल मीडिया असोसिएशन संघटना अध्यक्ष विजयकुमार बाबर, पत्रकार वैभव गंगणे,अनिकेत गायकवाड,रवी ढोबळे,बालाजी नवले, हरि नगरे, सतीश माने, सिद्धू डिंगणे, किरण कोळपे,योगेश भोसले,खालिद नदाफ, वैभव जाधव,राम नवले , सुदेश
सौमदळे, सुभाष ,सन्नके,अशोक सोनकंटले आदी मान्यवरांची उपस्थिती होती.
टाळ मृदंगांच्या निनादात या दिंडीस चार हुतात्मा पुतळ्यापासून सुरुवात झाली. पुढे सरस्वती चौक मार्गे मेकॅनिक चौक त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात आले. त्यानंतर या दिंडीचा समारोप करण्यात आला. सूत्रसंचालन पत्रकार वैभव गंगणे यांनी केले. अशोक सोनकंटले यांनी आभार मानले. यात सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील फोटोग्राफर्स पालखी आणि भजनी मंडळाचा यात समावेश होता.
0 Comments