Hot Posts

6/recent/ticker-posts

प्रभागातील नागरिकांना चांगल्या दर्जाच्या मूलभूत सुविधा देण्याचा प्रयत्न- किसन जाधव

 प्रभागातील नागरिकांना चांगल्या दर्जाच्या मूलभूत सुविधा देण्याचा प्रयत्न- किसन जाधव






सोलापूर (कटूसत्य वृत्त):- प्रभागातील नागरिकांना दर्जेदार मूलभूत सुविधा देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत रस्त्याच्या बाबतीमध्ये स्थानिक रहिवाशांनी वारंवार मागणी केली होती त्या मागणीचा विचार करून रस्त्याचा प्रश्न प्राधान्याने सोडवण्यात आला असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव यांनी २ नंबर झोपडपट्टी अंतर्गत आम्रपाली चौक ते चांदतारा मस्जिद परिसरातील रस्ता काँक्रिटीकरण कामाच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते. दरम्यान सोलापूर महानगरपालिका प्रभाग क्रमांक २२ येथे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनील तटकरे यांच्या माध्यमातून व सहकारी नगरसेवक नागेश गायकवाड यांच्या प्रयत्नातून सोलापूर महानगरपालिका स्थानिक स्वराज्य संस्था परिक्षेत्रात अधिसूचित विशिष्ट नागरिक सेवा सुविधा पुरविणे सन २०२३-२४ अंतर्गत ४२ लाख २७ हजार ६४९ रुपये खर्चित २ नंबर झोपडपट्टी येथील चाॅदतारा मज्जिद ते आम्रपाली चौक पर्यंत रस्ते कॉंक्रिटीकरण कामाचे शुभारंभ करण्यात आले. याप्रसंगी माजी नगरसेवक पैगंबर शेख, शहाजान शेख, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश युवक सरचिटणीस चेतन नागेश गायकवाड,मनसुद शेख, इकबाल मुल्ला, एम सलीम शेख, असद शेख, चांद शेख, वसीम मुल्ला, बडे साहेब कमलीवाले,अशपाक कुरेशी,उस्मान मुल्ला, सादिक कुरेशी, साहिल शेख, असद मुल्ला, शाहिद मुल्ला, मनसुद मुल्ला, राजमत मुल्ला, मौला पटेल, रवी गायकवाड, सिद्राम सलगर, मेहबूब मुजावर, सुबोध सोनकांबळे, शरणकुमार वाघमारे, यल्लाप्पा काळे, सिद्धू सलगर, सिद्धार्थ बोधले, सुजल वाघे, सुमित सोनकांबळे, सादिक शेख, अहमद आळगी, रवी सुरज गायकवाड, भुजंग तळभंडारे, अनिल लवटे, प्रदीप तळभंडारे, अनिल जाधव, बापू गायकवाड, समीर गायकवाड, मनोज सोनकांबळे, अतुल सरवदे, सचिन गोडसे,इंदुताई वाघमारे, ताराबाई इंगळे, गौराताई कोडके, चंदाताई मेंढे, नजीर मुल्ला, कमरूनुसार शेख, रुबिया शेख आदींची प्रमुख उपस्थितीत या रस्ता कामाचे विधिवत पूजन होऊन या रस्ता कामाचे शुभारंभ करण्यात आले. दरम्यान या परिसरातील नागरिकांच्या मागणीनुसार या रस्त्याचे काम हाती घेण्यात आले आहे प्रभागातील नागरिकांना दर्जेदार मूलभूत सुविधा मिळाव्यात यासाठी सहकारी नगरसेवक नागेश गायकवाड यांच्या माध्यमातून हे काम लवकरच पूर्ण होईल. या रस्त्याच्या कामामुळे वाहनधारकांना तसेच येथील स्थानिक रहिवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे असेही यावेळी किसन जाधव या रस्ता कामाच्या शुभारंभ प्रसंगी म्हणाले. दरम्यान गेल्या तीन वर्षापासून सोलापूर महानगरपालिकेत प्रशासक राजवट असून देखील राज्याचे कर्तव्यदक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून कार्यसम्राट नगरसेवक किसन जाधव आणि नागेश गायकवाड यांनी आपल्या प्रभागात विकास कामांचा धडाकाच सुरू केला आहे. यामुळे या प्रभागातील नागरिक मूलभूत सुविधांपासून वंचित नाहीत याचा आम्हाला समाधान वाटतो याचा सर्व श्रेय किसन जाधव आणि नागेश गायकवाड यांना जातो असे मनोगत यावेळी माजी नगरसेवक पैगंबर शेख यांनी याप्रसंगी व्यक्त केलं.  यावेळी स्थानिक रहिवाशांनी रस्त्याचा प्रश्न मार्गी लावल्याने किसन जाधव आणि नागेश गायकवाड यांचे आभार मानले.यावेळी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Reactions

Post a Comment

0 Comments