एकोप्याचा आणि उत्साहाचा सोहळा
महाराष्ट्र शुगर क्रिकेट लीग २०२५ पर्व सोलापूरची यशस्वी सांगता
सोलापूर, (कटूसत्य वृत्त):- क्रिकेटचा थरार, कामगारांमधील मैत्री, आणि प्रेक्षकांचा जल्लोष- अशा रंगीबेरंगी वातावरणात महाराष्ट्र शुगर क्रिकेट लीग २०२५ चा पहिला पर्व आज उत्साहात पूर्ण झाला. साखर उद्योगातील कारखान्यांमधील बंधुभाव वाढवण्यासाठी आणि उद्योगाची सकारात्मक प्रतिमा निर्माण करण्यासाठी सुयोग गायकवाड यांच्या संकल्पनेतून ही अनोखी लीग आयोजित करण्यात आली होती.
MSCL चा उद्घाटन सोहळा २ ऑगस्ट २०२५ रोजी सोलापूरच्या हरिभाई देवकरण प्रशालेच्या मैदानावर पार पडला. या वेळी साखर उद्योगातील मान्यवरांसह मराठी सिनेसृष्टीतील कलाकारांनी हजेरी लावून सोहळ्याची शोभा वाढवली. लीगचे सामने दयानंद महाविद्यालय मैदान, सोलापूर येथे झाले, तर अंतिम दोन दिवसांचे सामने माध्यमिक आश्रम प्रशाला, बालाजीनगर मंगळवेढा येथे खेळवण्यात आले व पारितोषिक वितरण सोहळा देखील इथेच पार पडला या प्रसंगी धनश्री सिताराम व आष्टी शुगर चे सर्वेसर्वा- शिवाजीराव काळुंगे सर
श्री.श्री. सद्गुरू साखर कारखाना चेअरमन - राव अंकल
सहकार महर्षी साखर कारखाना - MD चौगुले
ओंकार शुगर म्हैसगाव चे जनरल मॅनेजर बंडगर
सिताराम शुगर - जनरल मॅनेजर पाटील
सिताराम अर्बन संचालक - संजय चौगुले
सहकारी - प्यारेलाल सुतार
संध्यादीप कन्स्ट्रक्शन – काळे
आवताडे शुगर – बळवंत राव उपस्थित होते
एकूण 20 संघांच्या सहभागातून रोमांचक सामने रंगले.
ओंकार शुगर कॉर्पोरेशन लिमिटेड यांनी विजेतेपद पटकावत ३ लाख रुपयांचे पारितोषिक जिंकले. सहकार महर्षी शुगर उपविजेता ठरला व २ लाख रुपयांचे पारितोषिक मिळवले, तर तृतीय क्रमांकाच्या संघास म्हणजेच आवाडे शुगर व सीताराम शुगर यांना विभागून १ लाख रुपयांचे पारितोषिक देण्यात आले. स्पर्धेतील
‘मॅन ऑफ द सिरीज’
डॉक्टर गायकवाड (ओंकार शुगर कॉर्पोरेशन लिमिटेड) हा किताब यांना मिळाला. याशिवाय
उत्कृष्ट फलंदाज - विक्रम गाडे
उत्कृष्ट गोलंदाज - डॉक्टर गायकवाड
उत्कृष्ट फील्डिंग - बालाजी रूपनेर
यांसारखे सन्मान देखील देण्यात आले.
या MSCL चे संकल्पनाकार सुयोग गायकवाड यांनी आपल्या भाषणात सांगितले, “ही केवळ क्रिकेट स्पर्धा नाही, तर साखर उद्योगातील कुटुंबभावना, एकोपा आणि सकारात्मकतेचा उत्सव आहे. सोलापूरनंतर ही लीग संपूर्ण महाराष्ट्रात घेण्याचा आमचा मानस आहे.”
समारोप सोहळ्यातील उत्साह आणि आनंदाने साखर उद्योगातील कामगार व व्यवस्थापन यांच्यातील संबंध अधिक दृढ झाल्याचे चित्र दिसून आले. सोशल मीडियावरदेखील या उपक्रमाचे मोठ्या प्रमाणावर कौतुक होत आहे.
0 Comments