Hot Posts

6/recent/ticker-posts

सोलापूर जिल्हा परिषद व कंत्राटदार संघटनाच्या शिष्टमंडळ बरोबर झालेली बैठक राज्यास दिशा् देणारी ठरणार

सोलापूर जिल्हा परिषद व कंत्राटदार संघटनाच्या शिष्टमंडळ बरोबर झालेली बैठक राज्यास दिशा् देणारी ठरणार



सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सध्या राज्यातील अत्यंत महत्वाचा विषय असलेला हर घर जल या योजने अंतर्गत राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात मध्ये या योजने अंतर्गत कामे २०२२-२३ पासुन सुरु झाली,यामध्ये घरात बसुन सदर योजनांचे अंदाजपत्रक करणारे प्रायव्हेट कन्सल्टन्सी कंपनी व या कामावर लक्ष देणारी खासगी कंपनी मुळे सदर योजना व योजनांमुळे  राज्यात अडचणीत आले आहे.

यामध्ये कंत्राटदार यांची प्रलंबित देयके व इतर अनेक कामासंदर्भात अडचणी प्रत्यक्षात येत आहेत यावर उपाय योजना करण्यासाठी आज मंगळवार दि १२ ऑगस्ट २०२५ रोजी सोलापुरच्या जिल्हा परिषद मध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगमसो यांनी संबंधित या  विभागांनी निगडित सर्व अधिकारी बोलवले होते तसेच महत्त्वाचे वैशिष्ट्य सदर बैठकीस महाराष्ट्र राज्य पाणीपुरवठा कंत्राटदार संघटना चे राज्य अध्यक्ष इंजि मिलिंदजी भोसले उपस्थित होते .

सदर बैठकीस खालील पाच विषयांवर जवळपास एकमत होऊन हे विषय तातडीने नेण्याचे अंतिम केले आहे

१) जिल्हा मधील सर्व या योजनांच्या कंत्राटदार यांचे कामांना विनादंड मुदतवाढ देण्यासाठी शासनाकडून मंजूर करुन निर्णय घेणार आहे.

२) कंत्राटदार यांचे बिल जर प्रलंबित असेल तर संबंधित कामांचे अनामत रक्कम,अतिरिक्त सुरक्षा रक्कम,व इतर रक्कम परत करण्याचा निर्णय घेतला जाईल.

३) कामांचे कामे पुर्ण केल्यानंतर ही  कामे ग्रामपंचायत हस्तांतरित करुन घेत नाही याऐवजी आता स्वतः मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद प्रशासन मैदानात उतरुन हस्तांतरित करून घेईल.

४)काम केल्याबरोबर २१ दिवसांच्या आत स़बधीत विभागाने  कंत्राटदार यांचे देयके mb मध्ये लिहुन सविस्तर बिल तयार करणे.

५) प्रलंबित कंत्राटदार यांचे बिलांची सविस्तर यादी कार्यालयात न ठेवता जिल्हा परिषद च्या ठळक बोर्डावर पाहण्यासाठी ठेवणार व यामध्ये रोज यादी अपडेट करणार तसेच शासनाकडून निधी जिल्हा परिषदेस प्राप्त झाल्यानंतर सदर निधी सगळ्या कंत्राटदार यांना समप्रमाणात वाटप करण्यात येणार आहे ‌.

अशी महत्वाची पाच बाबी वर निर्णय झाला आहे .सदर बैठक जवळपास सविस्तर दीड तास झाली , यापुढे सदर योजनांचे सर्व कार्यपद्धती व नियम व सर्व योजनाचा प्रशासनाचा ताबा मा मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी स्वताकडे ठेवून जी पारदर्शकता या योजनांसाठी पाहिजे आहे ती सर्व करण्यासाठी कटिबद्ध आहे हे बैठकीतुन व संभाषणातून दाखवुन दिले आहे .येणारे काळात सदर बैठक व बैठक मधील झालेले ठराव व कार्यपद्धती ही महाराष्ट्र शासनाच्या जलजीवन मिशन च्या विभागासाठी दिशा देणारी ठरणार आहे ,हे नक्कीच जाणवत आहे.सदर‌बैठकीस सोलापूर जिल्हा पाणीपुरवठा संघटनेचे अध्यक्ष आनंद तोडकरी, सचिव विवेक राठोड, उपाध्यक्ष हेमंत जाधव, खजिनदार श्रीकांत सोनी, राज्य कार्यकारिणी सदस्य सुर्यकांत बिराजदार सह अनेक संघटनाचे संचालक उपस्थित होते.

Reactions

Post a Comment

0 Comments