Hot Posts

6/recent/ticker-posts

आ.नारायण पाटील यांचा वाढदिवस अन्नदान व फळ वाटपाने उत्साहात साजरा

 आ.नारायण पाटील यांचा वाढदिवस अन्नदान व फळ वाटपाने उत्साहात साजरा 



कुर्डूवाडी (कटूसत्य वृत्त):- येथील शहर काँग्रेस कमिटी व महाविकास आघाडीच्या वतीने काँग्रेस शहराध्यक्ष फिरोज खान यांच्या नेतृत्वाखाली करमाळयाचे आमदार नारायण पाटील यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला.गुरुवार दि.२१ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजणेच्या सुमारास वाढदिवसाचे औचित्य साधून कुर्डूवाडी येथील मतिमंद निवासी शाळेत अन्नदान व उम्मीद येथे फळ वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी बहुतांश बालकांनी फळांचा,अन्नदानाचा लाभ घेतला.

यावेळी पृथ्वीराज पाटील विलास उबाळे दत्ताजी गवळी हमीद शिकलकर शंकर बागल अतुल पाटील सचिन खैरे सोमनाथ देवकते शहानवाज शेख रवी आठवले इसाक अत्तार जावेद शेख झिशान मुलाणी नितीन आखाडे बालाजी साबळे पापा शेख सोहेल तांबोळी रफिक शेख मुजमिल शेख नितीन क्षीरसागर गणेश सुरवसे जावेद काझी सचिन गायकवाड आकाश खिलारे जमीर सय्यद रामा हनवते आदी उपस्थित होते.
Reactions

Post a Comment

0 Comments