Hot Posts

6/recent/ticker-posts

कुमठे कनिष्ठ महाविद्यालयात अकरावीच्या विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत

 कुमठे कनिष्ठ महाविद्यालयात अकरावीच्या विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत




सोलापूर (कटूसत्य वृत्त):- कुमठे प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयात 4 ऑगस्ट  रोजी  इयत्ता अकरावी कला व वाणिज्य विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले.
      प्रथमतः स्व. ब्रह्मदेव दादा माने यांच्या प्रतिमेचे पूजन करून अकरावीच्या विद्यार्थ्यांचे महाविद्यालयाचे पर्यवेक्षक वसंत गुंगे, कनिष्ठ महाविद्यालयातील प्रमुख प्रा. संजय जाधव, प्रा. दादाराव डांगे, प्रा. हणमंत शिंदे, प्रा.विजयकुमार वाळके, व प्रा. बंडोपंत बाबर यांच्या हस्ते अकरावीच्या मुला मुलींचे स्वागत करण्यात आले. याप्रसंगी वसंत गुंगे यांनी कॉलेज बद्दल विद्यार्थ्यांना सविस्तर माहिती सांगितली प्रा. संजय जाधव यांनी कॉलेजच्या शिस्तीबद्दल सर्व विद्यार्थ्यांना कल्पना दिली.  या सर्व नवीन प्रवेशित अकरावीच्या विद्यार्थ्यांना संस्थेचे अध्यक्ष दिलीपराव माने, मुख्य विश्वस्त जयकुमार माने, विश्वस्त स्वातीताई माने व प्राचार्य जयसिंग गायकवाड यांनी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. दीपक शिंदे सर यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. विनोद थोरात व आभार प्रा.राजीव निकम यांनी मानले.
Reactions

Post a Comment

0 Comments