ॲक्सिस बँक जॉब फेअरला युवक-युवतींचा उत्स्फूर्त प्रतिसाद
अकलूज (कटूसत्य वृत्त):- आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांचे मार्गदर्शनाखाली व खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या संकल्पनेतून शिवरत्न शिक्षण संस्था, शिवपार्वती सार्वजनिक विकास ट्रस्ट आणि शंकरराव मोहिते महाविद्यालय, अकलूज यांच्या संयुक्त विद्यमाने ॲक्सिस बँक जॉब फेअरचे आयोजन शिवरत्न नॉलेज सिटी, अकलूज येथे करण्यात आले. या रोजगार मेळाव्याला युवक युवतींचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला
या प्रसंगी ॲक्सिस बँकेचे अधिकारी विवेक अजमाने व धनश्री लोहकरे उपस्थित होते. त्यांनी बँकिंग क्षेत्रातील करिअरच्या संधी, आवश्यक पात्रता आणि निवड प्रक्रियेची माहिती सहभागी उमेदवारांना दिली.या मेळाव्यात १४७ युवक-युवतींनी सहभाग नोंदवला. लेखी परीक्षा व मुलाखती द्वारे पात्र उमेदवारांची निवड होणार आहे.
प्रसंगी शिवरत्न शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा शितलदेवी मोहिते-पाटील यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, शिक्षणासोबत रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे ही संस्थेची प्राथमिकता आहे. ग्रामीण भागातील तरुणांना करिअरच्या संधी मिळाव्यात व त्यांना मार्गदर्शन मिळावे, हा या जॉब फेअरचा उद्देश आहे.
या उपक्रमामुळे अकलूज व परिसरातील अनेक तरुणांना थेट नामांकित बँकेत रोजगाराची संधी उपलब्ध झाली. स्थानिक पातळीवर आयोजित झालेल्या या जॉब फेअरचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.यावेळेस शिवपार्वती सार्वजनिक विकास ट्रस्टचे संचालक विश्वतेजसिंह मोहिते-पाटील, सचिव शिवदास शिंदे ,धर्मराज दगडे,डाॅ विश्वनाथ आवड,श्रीकांत राऊत, नितीन बनकर, दत्तात्रय लिके,रामकृष्ण काटकर,शंकरराव मोहीते महाविद्यालयाचे प्राचार्य टिळेकर सर,मॅनेजमेंट स्टडीजचे प्राचार्य भारत साठे,ग्रीनफिंगर्स कॉम्प्युटर काॅलजचे उपप्राचार्य डाॅ.महेश ढेंबरे,अश्रफ शेख व इतर मान्यवर उपस्थित होते.
0 Comments