Hot Posts

6/recent/ticker-posts

निवडणूक आयोग कार्यालयावरील मोर्चात खा.धैर्यशील मोहिते पाटील यांचा सहभाग

 निवडणूक आयोग कार्यालयावरील मोर्चात खा.धैर्यशील मोहिते पाटील यांचा सहभाग




अकलूज (कटूसत्य वृत्त):- लोकसभेचे विरोधीपक्ष नेते खा. राहुल गांधी यांनी निवडणूक मतदार याद्यांमधील घोळ चव्हाट्यावर आणला. संविधानाने प्रदान केलेल्या 'एक मतदार, एक मत' या मूल्यावर आपली लोकशाही मार्गक्रमण करत असताना अनेक ठिकाणी एका मतदाराला अनेक मतांचा लाभ, अनेक ठिकाणी अस्तित्वात नसलेल्या मतदारांचे यादीत नाव, तर अनेक ठिकाणी खरोखर अस्तित्वात असलेल्या मतदारांना यादीतून गायब करण्यात आले.

हा घोटाळा पुराव्यानिशी समोर आल्यावर आता देशाचा नागरिक म्हणून निवडणूक आयोगाला याचा जाब विचारणे हा प्रत्येकाचा अधिकार आहे. पण, निवडणूक आयोगाने या अधिकारावरही बंधन आणले. यापार्श्वभूमीवर इंडीया आघाडीच्या सर्व राज्यसभा, लोकसभा खासदारांचा संसद भवन ते निवडणूक आयोग कार्यालयावर मोर्चा निघाला यात खा.धैर्यशील मोहिते-पाटील हे देखील सहभागी झाले होते.

Reactions

Post a Comment

0 Comments