Hot Posts

6/recent/ticker-posts

नातेपुते येथील महाविद्यालयात डॉ.एस.आर. रंगनाथन यांची जयंती साजरी

 नातेपुते येथील महाविद्यालयात डॉ.एस.आर. रंगनाथन यांची जयंती साजरी




नातेपुते (कटूसत्य वृत्त):- नातेपुते- येथील सहकार महर्षि शंकरराव मोहिते- पाटील महाविद्यालयाचे प्र.प्राचार्य डॉ . बाळासाहेब निकम यांच्या मार्गदर्शनाखाली व ग्रंथपाल प्रा. दिलीप शिंदे यांच्या नियोजनाखाली ग्रंथालय शास्त्राचे जनक डॉ.शियाली रामामृत रंगनाथन यांची १३३ वी जयंती  राष्ट्रीय ग्रंथपाल दिन म्हणून साजरी करण्यात आली. या प्रसंगी प्र.प्राचार्य डॉ. बाळासाहेब निकम यांच्या हस्ते डॉ रंगनाथन यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. प्राचार्यांनी ग्रंथालयाचे महत्त्व याबद्दल सर्वांना मार्गदर्शन केले तसेच ग्रंथपाल प्रा.दिलीप शिंदे यांनी आपले विचार मांडताना 'ग्रंथालयांच्या विकासात डॉ. रंगनाथन यांचा फार मोठा वाटा आहे. डॉ. रंगनाथन यांचे ग्रंथालय चळवळीतील योगदान सांगितले.  तसेच त्यांचे ग्रंथालयाविषयक कार्य याविषयी माहिती दिली. “ ग्रंथा सारखा दूसरा गुरु नाही ” हे विद्यार्थ्यांना सांगितले तसेच वाचकांनी सतत वाचन करणे आवश्यक आहे. म्हणूनच आजच्या दिवशी ग्रंथालय चळवळीत आणि वाचन संस्कृतीमध्ये डॉ. रंगनाथन यांच्या योगदानाचा गौरव केला जातो. असे विचार मांडले.  कार्यक्रमाचे प्रस्ताविक ग्रंथपाल प्रा.दिलीप शिंदे यांनी केले. याप्रसंगी महाविद्यालयाचे ज्येष्ठ प्राध्यापक जे.डी.मुळीक, डॉ. डी.जी. शहाणे, एस.एच पवार, डॉ.डी.एस थोरात, डॉ. एस.पी सूर्यवंशी, डॉ. एस.ए बनसोडे, डॉ.कांबळे मॅडम, ए.बी घेमाड, आर. व्ही साठे, एस.सी बर्गे, डी.के साठे, एच
जे. मोगल, व्ही.के गवळी, पी.डी कोडलकर, एम.व्हाय वाघमोडे, एन.डी देशपांडे, मिस.मोगल मॅडम, राजगुरू मॅडम, मसुगडे मॅडम व कार्यालयीन अधिक्षक हनुमंत वाघमोडे,ग्रंथालयाचे कर्मचारी नागराज करपे ,संध्या सूर्यवंशी, ज्ञानेश्वर बोराटे व विद्यार्थीवर्ग उपस्थित होते. 

Reactions

Post a Comment

0 Comments