स्काऊट गाईड तर्फे इको फ्रेंडली गणेश मूर्ती कार्यशाळा
शाडूच्या मूर्त्या बनवून स्काऊट गाईड विद्यार्थ्यांनी दिली पर्यावरण रक्षणाचा संदेश_
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- जिल्हा परिषद शिक्षण विभाग व सोलापूर शहर जिल्हा भारत स्काऊट आणि गाईड संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने इको फ्रेंडली गणेश मूर्ती बनविण्याचे कार्यशाळा घेण्यात आली.
या कार्यशाळेचे उदघाटन पिपंळनेरच्या आर्या पब्लिक स्कूल प्राचार्य रवींद्र लोखंडे यांच्या हस्ते करण्यात आले.
या कार्यशाळेत श्री दिगंबर जैन गुरुकुल प्रशाला, बाळीवेस सोलापूर, हरीभाई देवकरण प्रशाला सोलापूर, नेताजी सुभाष चंद्र बोस प्रशाला नीलम नगर सोलापूर आदी शाळेतील ११० स्काऊट गाईड विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.लोखंडे म्हणाले, पर्यावरण पूरक उत्सव साजरा करण्याचा संदेश जनमानसात पोहोचविण्याच्या उद्देशाने ही कार्यशाळा घेण्यात आल्याचे सांगितले.विद्यार्थ्यांचे कौतुक करत प्रत्येकाने बनविलेल्या मातीची गणेशमूर्ती प्रतिष्ठापित करून पर्यावरणाचा समतोल राखण्यास मदत करावा असे आवाहन केले. स्काऊट मास्टर शैलेश स्वामी यांनी विद्यार्थ्यांना शाडूच्या मातीपासून गणेश मूर्ती तयार करण्यासाठी प्रात्यक्षिकांसह मार्गदर्शन केले. सर्व ११० स्काऊट गाईड विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन प्रत्यक्ष माती पासून मूर्ती बनवण्याचा आनंद घेतला व स्वकल्पकतेतून विविध रूपांतील गणेश मूर्ती साकारल्या.
यावेळी गाईड कॅप्टन तृप्ती खोबरे, स्काऊट मास्टर रेवणसिद्ध दसले यांनी कार्यशाळेनंतर हॅन्ड वॉश प्रात्यक्षिके दाखविली व मार्गदर्शन केले. कार्यशाळा यशस्वी होण्यासाठी जिल्हा स्काऊट संघटक श्रीधर मोरे, जिल्हा संघटक गाईड अनुसया, तृप्ती खोबरे, माळी, प्रमोद जाधव, रोव्हर्स कुशल घागरे, उजेफ बागवान, रिजवाना पठाण तसेच कार्यालयीन कर्मचारी
यांनी परिश्रम घेले. जिल्हा मुख्य आयुक्त तथा प्राथमिक शिक्षणाधिकारी कादर शेख साहेब, जिल्हा आयुक्त स्काऊट तथा माध्यमिक शिक्षणाधिकारी सचिन जगताप,जिल्हा आयुक्त गाईड तथा प्राथमिक उपशिक्षणाधिकारी रूपाली भावसार व जिल्हाचिटणीस तथा माध्यमिक उपशिक्षणाधिकारी विठ्ठल ढेपे आदींनी या सहभागी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

0 Comments