Hot Posts

6/recent/ticker-posts

स्त्रीभ्रूण हत्या रोखण्यासाठी मन परिवर्तनाची गरज

 स्त्रीभ्रूण हत्या रोखण्यासाठी मन परिवर्तनाची गरज


कुरूल  (कटूसत्य वृत्त):- 

स्त्री भ्रूणहत्या रोखण्यासाठी मन परिवर्तनाची गरज आहे, असे मत विधी सेवा समितीच्या अध्यक्षा तथा मोहोळ न्यायालयाच्या न्यायाधीश पी. एस. गोवेकर यांनी व्यक्त केले.

मोहोळ नगरपरिषद येथे विधी सेवा समिती व विधिज्ञ मंडळ मोहोळ यांच्या संयुक्त विद्यमाने

विधी साक्षरता शिबिर आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी मार्गदर्शन करताना प्रमुख पाहुण्या म्हणून न्यायाधीश गोवेकर बोलत होत्या. विधी साक्षरता शिविरास विधिमंडळाचे अध्यक्ष के.

बी. चौधरी, अॅड. मनोज गावडे, मोहोळ नगरपरिषदेचे कार्यालयाचे अधीक्षक रणजित कांबळे, प्रियंका

गोरे, अमित लोमटे, राजू शेख, हर्षल माने, किशोर स्वामी, दिलीप जाधव, विधी स्वयंसेवक महेश शिंदे, कनिष्ठ लिपिक मिथुन भडंगे आदींची प्रमुख उपस्थिती होती. 

'हुंडा', जात व 'स्त्रीभ्रूण हत्या या विषयासंबंधी आयोजित केलेल्या साक्षरता शिबिरात विधी

सेवा प्राधिकरणाचे सदस्य तथा पी. एल.व्ही. राजन घाडगे यांनी आई.... नको करु... तू गं.. तुझ्या

लेकीचे हाल..नको गर्भात मारु.. मला जन्माला घाल... हे गीत सादर करून उपस्थितीत महिलांची

मने जिंकली. 

हुंडा या विषयावर अँड. आकाश कापुरे तर स्त्रीभ्रूण हत्या या विषयासंबंधी अॅड. सुचिता

इवरे यांनी विचार मांडले. या कार्यक्रमास मोहोळ नगरपरिषदेचे अधिकारी, कर्मचारी व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अँड. सोनल जानराव यांनी केले तर आभार विधी स्वयंसेवक रामलिंग महामुनी यांनी मानले.

Reactions

Post a Comment

0 Comments