अण्णाराव कुंभार यांना श्री होटगीश्वर चिंतामणी रत्न पुरस्कार प्रदान
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- नीलम नगर येथील नेताजी सुभाषचंद्र बोस शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अण्णाराव कुंभार यांना श्री बृहन्मठ होटगी संस्थेच्यावतीने काशी पीठाचे जगद्गुरु श्री श्री श्री १००८ डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजी यांच्या अमृत हस्ते 'श्री होटगीश्वर चिंतामणी रत्न' पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
अक्कलकोट रोडवरील श्री वीरतपस्वी मंदिरात आयोजित काशी पीठाचे जगद्गुरु डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजी यांच्या अनुष्ठान समाप्ती कार्यक्रमानिमित्त आयोजित कार्यक्रमात सत्कार व सन्मान करण्यात आला.सन्मान पत्र, पुर्ण अहेर,अर्धा तोळा सोने,हार,शाल, श्रीफळ असे पुरस्कार स्वरुप होते
श्री अण्णप्पा गेनप्पा कुंभार हे श्री सिध्दारामेश्वरांच्या पावन नगरीत वसलेल्या श्री बृहन्मठ होटगी मठाचे परमपूज्य गुरुवर्य श्री तपोरत्नं योगीराजेंद्र शिवाचार्य महास्वामीजी यांच्या सहवासात ४८ वर्षे गुरु भक्तीत तल्लीन होऊन गुरु, लिंग, जंगम या त्रिवेणी संगमातून मठ, समाज, शाळा वसतिगृह व राष्ट्र उभारणीसाठी केलेले शैक्षणिक, धार्मिक, आध्यात्मिक कार्य हे आदर्शवत आहे.वीरशैव धर्मात अध्यात्मिक क्रांती घडविण्यासाठी महत्वपूर्ण योगदान दिलेले आहे. श्री बृहन्मठ होटगी मठाचे मठाधिपती श्री योगिराजेंद्र शिवाचार्य महस्वामीजींचे गुरु वाणी हे प्रमाण मानून आजतागायत आपण जीवन समर्पित करित आहात हे आपल्या कार्यातून दिसून येत आहे. याबद्दल श्री बृहन्मठ होटगी संस्थेच्यावतीने 'श्री होटगीश्वर चिंतामणी रत्न' पुरस्कार देऊन आपल्या सहपरिवारास शुभाशिर्वाद देत असल्याचे काशी जगद्गुरु श्री श्री श्री १००८ डॉ.मल्लिकार्जुन शिवाचार्य महास्वामीजी यांनी केले.
यावेळी कुंभार यांच्या परिवारातील सर्व सदस्य उपस्थित होते.याप्रसंगी शिवाचार्य गण,समाजातील मान्यवर म॔डळी उपस्थित होते.
कुंभार सरांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल समाजातील मान्यवरांनी आनंद व्यक्त करून अभिनंदन केले. बृहन्मठ होटगी संस्थेत केलेल्या बहुमोल सेवेचे फळ मिळाले असल्याचे समाजातून प्रतिक्रिया येत आहे.
0 Comments