Hot Posts

6/recent/ticker-posts

सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर पंढरपूर शहर पोलीसांचा रुट मार्च

 सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर पंढरपूर शहर पोलीसांचा रुट मार्च



 

   पंढरपूर (कटूसत्य वृत्त):- गणेशोत्सव व ईद-ए-मिलाद उत्सवादरम्यान शहरात कुठलाही अनुचित प्रकार घडू नये तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी यासाठी शहरातील मुख्य मार्गावरुन पंढरपूर शहर पोलीसांचा रुट मार्च काढण्यात आला.

     सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर पंढरपूर शहर पोलीसांनी शहर पोलीस ठाणे हद्दीतील  इंदिरा गांधी चौक, कैकाडी महाराज मठ, जुनी पेठ, मटन मार्केट, नाथ चौक, गांधी रोड, चौफळा, छत्रपती शिवाजी महाराज चौक, स्टेशन रोड असा  रूट मार्च घेण्यात आला.

         यावेळी शहर पोलीस ठाणे येथील  सहा  पोलीस अधिकारी 39 पोलिस अंमलदार, एक  क्युआरटी पथक, एक आरसीएफ पथक  सहभागी झाले होते. अशी माहिती शहर पोलीस निरिक्षक विश्वजित घोडके यांनी दिली.

Reactions

Post a Comment

0 Comments