नातेपुते येथील एस.एन.डी.स्कूलच्या विद्यार्थ्यांचे तालुकास्तरीय शालेय कराटे स्पर्धेत यश
नातेपुते (कटूसत्य वृत्त):- धनशैल्य विद्यालय, (गिरझणी) ता. माळशिरस येथे घेण्यात आलेल्या तालुका स्तरीय शालेय कराटे स्पर्धेमध्ये नातेपुते येथील एस.एन.डी.स्कूलच्या विद्यार्थ्यांनी यश मिळवून जिल्हास्तरीय कराटे स्पर्धेसाठी निवड करण्यात आली. यशस्वी झालेले विद्यार्थी यामध्ये १४ वर्ष वयोगटामध्ये ४० किलो वजन गटात राजवर्धन चिंचकर प्रथम क्रमांक,१७ वर्ष वयोगटामध्ये ४५ किलो वजन गटात प्राची थोरात प्रथम क्रमांक,१७ वर्ष वयोगटामध्ये ६० किलो वजन गटात क्रांती लाटणेकर प्रथम क्रमांक, १७ वर्ष वयोगटामध्ये ५० किलो वजन गटात द्वितीय क्रमांक,१४ वर्ष वयोगटामध्ये ४० किलो वजन गटात राजवर्धन चिंचकर प्रथम क्रमांक, १४ वर्ष वयोगटामध्ये ३० किलो वजन गटात प्रणवी झगडे तुतीय क्रमांक,१४ वर्ष वयोगटामध्ये ३५ किलो वजन गटात सानवी मोरे तुतीय क्रमांक मिळविला त्याबद्दल वरील सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना स्कूलचे चेअरमन मालोजीराजे देशमुख व संचालक मंडळ यांनी फेटा हार घालून सन्मान केला व जिल्हास्तरीय कराटे स्पर्धेच्या निवडीबद्दल शुभेच्छा दिल्या. यावेळी मुख्याध्यापक संदीप पानसरे उप मुख्याध्यापक शकूर पटेल पी आर ओ मनोज राऊत शारीरिक शिक्षण विभागाच्या कोमल किर्दक उपस्थित होत्या. यावेळी बोलत असताना स्कूलचे चेअरमन मालोजीराजे देशमुख म्हणाले की, शरीराच्या पोषणासाठी ज्याप्रमाणे निरोगी पोषक आहाराचे आवश्यकता असते त्याचप्रमाणे आपले जीवन सुधारण्यासाठी स्पर्धेत भाग घेणे खेळ खेळणे स्पर्धेत सहभागी होणे खूप महत्त्वाचे आहे. त्यामुळे कौशल्ये आणि क्षमता सुधारला जातात व शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी फायदे होतात व्यक्तिमत्वाचा विकास वाढतो.
0 Comments