डॉल्बी मुक्त गणेश उत्सव साजरा करा- पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- दिनांक २७.०८.२०२५ ते ०६.०९.२०२५ या कालावधीत महाराष्ट्र राज्यात सर्वत्र "गणेश उत्सव" साजरा करण्यात येत आहे. गणेश उत्सव हा महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात साजरा आनंदाने व मोठ्या उत्साहाने साजरा होत असतो याचा मोठा ताण पोलीस विभागावर येत असतो. यामुळे या उत्सावात नागरीकांचे आचरण कसे असावे, गणेश मंडळानी कशा प्रकारे उत्सव साजरा करावा यासाठी अतुल कुलकर्णी, पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण यांनी सोलापूर ग्रामीण जिल्ह्यातील शांतता समितीचे अध्यक्ष व सदस्य यांची बैठक आयोजीत केली होती. सदरची बैठक ही नियोजन भवन येथील हॉलमध्ये संपन्न झाली.
या बैठकीसाठी सोलापूर ग्रामीण जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी, शांतता समितीचे सदस्य, मोहला समितीचे सदस्य, गणेश मंडळाचे अध्यक्ष, गणेश मुर्ती विक्रेते, डॉल्बी धारक हे हजर होते.
या बैठकीस मार्गदर्शन करताना अतुल कुलकर्णी, पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण यांनी सर्व उपस्थितांना शांततेत परंतू मोठ्या उत्सहात गणेश उत्सव साजरा करण्यासाठी मार्गदर्शन केले. यामध्ये गणेश उत्सव हा सर्व सामान्यांचा सार्वजनिक उत्सव असून हा उत्सव साजरा करण्यासाठी गणेश मंडळांनी समाजाला फायदा होणारे गावामध्ये CCTV बसवणे, वृक्षारोपण करणे, रक्तदान शिबीर आयोजीत करणअसे चांगले उपक्रम राबवावेत, तसेच उपस्थित जनममुदायाला या वर्षी गणेश उत्सव दरम्यान No DJ - No Dolby ही योजना राबवून डॉल्बी सिस्टममुळे लहान वृध्द यांना होणारे धोके, ध्वनीप्रदुषण याबाबत माहिती दिली. या बैठकीसाठी हजर असणारे शांतता समितीचे सदस्य व गणेश मंडळ यांनी त्यांच्या गावामध्ये व मंडळामध्ये No DJ - No Dolby ही योजना राबवत असल्याचे समक्ष आश्वासन दिले.
यावेळी अतुल कुलकणी, पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण, प्रितम यावलकर, अपर पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण, शिरीष हुंबे, पोलीस उप-अधीक्षक (मुख्यालय), नामदेव शिंदे, पोलीस निरीक्षक, जिल्हा विशेष शाखा, सोलापूर ग्रामीण व जिल्ह्यातील गोपनियचे काम पाहणारे अंमलदार हजर होते.
0 Comments