श्रावणी सूर्यवंशी ची राष्ट्रीय स्पर्धेत ३ सुवर्ण पदकासह हॅट्रिक - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, August 11, 2025

श्रावणी सूर्यवंशी ची राष्ट्रीय स्पर्धेत ३ सुवर्ण पदकासह हॅट्रिक

 श्रावणी सूर्यवंशी ची राष्ट्रीय स्पर्धेत ३ सुवर्ण पदकासह हॅट्रिक




बेंगलोर (कटूसत्य वृत्त):- दि. ४ ते ८ ऑगस्ट २०२५ दरम्यान बेंगलोर येथील केन्सिंगटन स्विमिंग पूल येथे पार पडलेल्या ४१ व्या सब ज्युनियर आणि ५१ व्या ज्युनियर नेशनल अक्वाटिक्स चैम्पियनशिप २०२५ या राष्ट्रीय स्पर्धेत, सोलापूरच्या श्रावणी प्रताप सूर्यवंशी हीने महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व कराताना डायविंग या क्रीडा प्रकारात १९ वर्षे वयोगटात खेळताना तीन सुवर्ण पदकासह हॅट्रीक साधली आहे.

श्रावणी ही देगांव येथील स्व.मीनाताई ठाकरे (माँसाहेब) क्रिडा व शिक्षण प्रसारक मंडळ संचलित कला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय देगांव, सोलापूरची विद्यार्थिनी असून ती इयत्ता १२ वी शास्त्र शाखेत शिकत आहे.  या स्पर्धेत श्रावणी ने महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले असून
दि. ६ ऑगस्ट रोजी डायव्हींग मधील हायबोर्ड मध्ये खेळताना २८८.०५ गुणासह श्रावणीने गोल्ड मेडल पटकावले. दि. ७ ऑगस्ट रोजी झालेल्या 3 मीटर स्प्रींग बोर्ड मध्ये खेळताना ३१३.३० गुणासह दुस-या सुवर्ण पदकावर नांव कोरले आहे. याच क्रीडा प्रकारातील 1 मीटर स्प्रीग बोर्ड ची स्पर्धा दि.८ ऑगस्ट रोजी पार पडली असून, यामध्ये श्रावणी  ही २६८.१५ गुणासह तिस-या सुवर्ण पदकाची मानकरी ठरली.

या राष्ट्रीय डायव्हींग स्पर्धेत देशातील महाराष्ट्र, तमिळनाडू, मध्यप्रदेश, कर्नाटक, पश्चिम बंगाल, मणिपूर, गुजरात इत्यादी राज्यातील व एसएसईबी च्या मुलीनी सहभाग नोंदविला. या स्पर्धेत महाराष्ट्राला  ११ गोल्ड, ५ सिल्वर, ७ ब्राँज, असे एकुण २३ पदके मिळाली. यामध्ये सोलापूरच्या एकटया श्रीवणी सुर्यवंशी ने 3 गोल्ड मेडल मिळवत हॅट्रीक साधत मोलाचा वाटा उचलला.

श्रावणीने आजवर डायव्हींग क्रीडा प्रकारामध्ये शालेय आणि फेडरेशन च्या वतीने घेतल्या गेलेल्या स्पर्धेत

राज्य पातळीवर २२ गोल्ड,  ६ सिल्वर,  १ बाँझ‍
राष्ट्रीय पातळीवर  १५ गोल्ड, ५ सिल्वर, २ बाँझ,
आतंरराष्ट्रीय      २ गोल्ड,   ४ सिल्वर,  २ बाँझ

याप्रमाणे तिने एकूण ५९ पदके वयाच्या अवघ्या १७ व्या वर्षात आपल्या नावांवर केली आहेत. यासाठी तिला, तिचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे कोच श्रीकांत शेटे, कुंजकिशोर मेलेम, अतुल पाटील सरांचे मोलाचे मार्गदर्शन लाभत आहे विशेष सोलापूर जिल्हा  इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे  सहाय्यक संचालक गणेश सोनटक्के साहेब यांनी श्रावणीच्या यशाचे कौतुक करीत तिला पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या दरम्यान स्व.सौ.मीनाताई ठाकरे (माँसाहेब) क्रिडा व शिक्षण प्रसारक मंडळ संचलित कला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय देगांव, संस्थेचे  अध्यक्ष दत्तात्रय वानकर,  विश्वस्त विठ्ठल वानकर, प्राचार्य खांडेकर आर वी क्रीडाशिक्षक बेलुरे तसेच सर्व शिक्षकवृंद व कर्मचारीवृंद यांनी श्रावणीचे यश अभिमानास्पद असल्याच्या भावना व्यक्त केल्या आहेत.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages