रेणुका पतसंस्थेची ४० कोटीने उलाढालीत वाढ, १२ टक्के लाभांश जाहीर : बाबाराजे देशमुख
नातेपुते (कटूसत्य वृत्त):- व्यापारी वर्गांना व्यापारी पेठेत अनेकांना पैसे लागतात. खातेदारांना मागेल तेवढी रक्कम द्यावी लागते. ९० टक्के खातेदार चांगले तर १० टक्के खातेदारांच्या अडचणी असतात. पतसंस्थेविषयी निष्ठा असणारी प्रामाणिक कर्मचारी, संचालक मंडळ संस्थेमध्ये असल्याने रेणुका पतसंस्थेची ४० कोटीने उलाढालीत वाढ झाली असल्याचे प्रतिपादन सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष व रेणुका पतसंस्थेचे चेअरमन बाबाराजे देशमुख यांनी व्यक्त करून सभासदांना १२ टक्के लाभांश जाहीर केला. ते रेणुका पतसंस्था, रेणुका महिला पतसंस्था, हर हर महादेव पतसंस्था तसेच समाज भूषण नानासाहेब देशमुख विकास सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये बोलत होते. यावेळी माजी आमदार अँड. रामहरी रुपनवर, सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष बाबाराजे देशमुख, रेणुका महिला पतसंस्थेच्या चेअरमन सुचित्रादेवी देशमुख, संचालिका श्रुतिका देशमुख, अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती मामासाहेब पांढरे, शिवप्रसाद अर्बनच्या चेअरमन ऋतुजा मोरे, नगराध्यक्षा अनिता लांडगे, मा.उपनगराध्यक्ष मालोजीराजे देशमुख, अँड. बी.वाय.राऊत, माळशिरस पंचायत समितीचे सदस्य माऊली पाटील, धैर्यशील देशमुख अमरशिल देशमुख राजाभाऊ देशमुख डॉ.एम.पी.मोरे, महेश शेट,उद्योजक अतुल बावकर,विलास काळे, संतोष काळे, राजेश चंकेश्वरा, वामन पलंगे डॉ.प्रशांत गांधी, बाहुबली चकेश्वरा, अमोल उराडे, एन.के.साळवे, युवराज वाघमारे, सतिश सपकाळ, सुवर्णा पांढरे, मिनल कुलकर्णी उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते प्रतिमा पूजन व दीप प्रज्वलन करण्यात आले. रेणुका पतसंस्थेचे अहवाल वाचन नारायण बोराटे, रेणुका महिला पतसंस्थेचे अहवाल वाचन अशोक करचे, हर हर महादेव पतसंस्थेचे अहवाल वाचन उमेश पोतदार, समाजभूषण नानासाहेब देशमुख विकास सोसायटीचे अहवाल वाचन बापूराव पाटील यांनी केले. सभेच्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मालोजीराजे देशमुख यांनी केले असून आभार सुवर्णा पांढरे यांनी मानले सर्वसाधारण सभेसाठी नातेपुते येथील पतसंस्थेचे चेअरमन व्यापारी वर्ग सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित सर्वांसाठी भोजन व्यवस्था करण्यात आली होती.
चौकटीत :
पतसंस्था काढता येतात परंतु चालवणे अवघड आहे. सिस्टीम समजून घेतली पाहिजे तालुक्यामध्ये पतसंस्थेची वाईट परिस्थिती आहे. भान ठेवून निर्णय घेणे गरजेचे
अँड रामहरी रूपनवर ( माजी आमदार )
चौकटीत :
गोरगरीब जनतेच्या व्यवसायाला आर्थिक पाठबळ मिळावे म्हणून कै.नानासाहेब देशमुख यांनी
रेणुका पतसंस्थेची स्थापना १४ जानेवारी १९८६ साली केली. पतसंस्थेमुळे अनेकांचे व्यवसाय उभारले सुरुवातीला ५०९ सभासदावर सुरू केलेली पतसंस्था आज ११२८ सभासद आहेत. पतसंस्थेची प्रगतीची वाटचाल असून भाग भांडवल २ कोटी ३८ लाख, ठेवी ४८ कोटी ९ लाख, गुंतवणूक १७ कोटी ५७ लाख , नफा ४० लाख.
मालोजीराजे देशमुख
(मा. उपनगराध्यक्ष तथा रेणुका पतसंस्था संचालक )
0 Comments