१६ वर्ष्याची सामाजिक बांधिलकी जपत १३,५०० गरजूना नौकऱ्या दिल्या.
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- दि. ७ ऑगस्ट २०२५ रोजी करिअर पॉईंट प्लेसमेंट सर्व्हिसेस या संस्थेचा १६ वर्धापन दिन हॉटेल बालाजी सरोवर येथे उत्सहाने साजरा.कार्यक्रमाचे उदघाटन माननीय माजी आमदार राजनजी पाटील यांच्या हस्ते दीप प्रजलीत करून करण्यात आला. त्यानंतर संस्थेमधील गुणवंत कर्मचाऱयांना त्यांच्या हस्ते गौरवण्यात आले. त्याप्रसंगी त्यांनी संस्थेमधील कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन व पुढील वाटचालीस शुभेच्या दिल्या.या प्रसंगी संस्थेचे प्रमुख माननीय रमेश वायचळ यांनी संस्थेचा सोळा वर्ष्याचा प्रवास कथित केला.
त्यावेळेस त्यांनी सांगितले २००९ रोजी संस्थेची सुरुवात केवळ २ कर्मचारी व १ क्लायंटनि १०० फूटयाच्या गाळ्यामधे केली होती. आज या संस्थेमध्ये ५० कर्मचारी संपूर्ण भारतातून कार्य करीत आहेत. संस्थेने आजपर्यंत १३५०० गरजूना संपूर्ण भारतभर विना मोबदला नौकऱ्या दिल्या आहेत.
त्यांच्या या कार्याबद्दल अनेक संस्थेने त्यांना गौरविलेले आहे खास करून महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार
संघानेही त्यांना मागील वर्षी गौरविलेले आहे. संस्थेस नुकताच ISO १०००२:२०१८ हे प्रतिस्थेचे मानांकन मिळाले आहे. संस्थेचा मानस आहे येणाऱ्या तीन महिन्यामध्ये परदेशात हि नौकऱ्या उपलबद्ध करून देणार आहे.
या नंतर शिव व्यख्याते माननीय शिवरत्न शेटे यांनी त्यांच्या अनोख्या संभाषण कौश्यल्य मधून छत्रपती शिवाजी महाराज कसे मॅनॅजमेण्ट गुरु होते. त्यांनी कसे सर्व प्रतिकूल परीस्तिमधे स्वराजाचे निर्माण केले. त्यांना आलेल्या प्रत्येक अडचणी व त्यांवर त्यांनी केलेली मात या विषयी सविस्तर कथन केले.या कार्यक्रमाचे सूत्र संचालन सुरज वर्मा यांनी केले. या प्रसंगी संस्थेचे व्यावसायिक भागीदार उमाकांत येलका, मोहसीन शेख, करिष्मा सैफन, परवीन मुल्ला, रोझिना सैय्यद, अमृता साळुंके व अभिषेक गंगारेड्डी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अनिकेत दादास, हरीश पवार, सचिन नादरगी, राकेश चितारे व साक्षी वायचळ विशेष परिश्रम घेतले.
0 Comments