डीजीसीए यांच्याकडून स्टार एअरला सोलापूर ते मुंबई विमान सेवा सुरू करण्यास परवानगी
- जिल्हाधिकारी आशीर्वाद
सोलापूर, (कटूसत्य वृत्त):- सोलापूरचे सर्वसामान्य नागरिक, उद्योजक, व्यापारी आणि लोकप्रतिनिधी यांची दीर्घ कालावधीपासून प्रलंबित असलेली सोलापूर ते मुंबई विमानसेवेची मागणी माहे सप्टेंबर 2025 अखेरपर्यंत पूर्ण होत आहे. डीजीसीए कडून स्टार एअरला सोलापूर ते मुंबई विमान सेवा सुरू करण्याची परवानगी मिळालेली आहे. तसेच महाराष्ट्र एअरपोर्ट ऑथॉरिटी यांच्याशीही स्टार एअर चा करार झालेला आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली.
महाराष्ट्र एअरपोर्ट ऑथॉरिटीचा स्टार एअर शी करार झाल्याने सोलापूर ते मुंबई विमान सेवा लवकरच सुरू होत आहे. स्टार एअर लवकरच तिकीट विक्रीला सुरुवात करून साधारणतः सप्टेंबर 2025 अखेरपर्यंत सोलापूरहून मुंबईला पहिले प्रवासी विमानाचे उड्डाण होईल. ही विमान सेवा सुरू झाल्यास सोलापूरचा औद्योगिक, व्यापारी, पर्यटन व शैक्षणिक विकास होण्यास मोठा प्रमाणावर चालना मिळणार आहे.
राज्याचे मुख्यमंत्री मा.श्री.देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील राज्य शासनाने नुकताच मंत्रिमंडळ बैठकीमध्ये “उडान” योजनेअंतर्गत 14 कोटीची व्हायाबिलिटी गॅप फडिंगची तरतुद करुन सोलापूर-पुणे-मुंबई विमानसेवा सुरु करण्यासाठी पुढाकार घेतलेला आहे.
0 Comments