Hot Posts

6/recent/ticker-posts

बार्शीत तब्बल 100 किलोपेक्षा जास्त गांजा जप्त

 बार्शीत तब्बल 100 किलोपेक्षा जास्त गांजा जप्त




 बार्शी पोलिसांची धाडसी कारवाई

बार्शी (कटूसत्य वृत्त):- बार्शी तालुका पोलीसांनी अवघ्या एका धाडसी कारवाईत तब्बल 100 किलोपेक्षा जास्त प्रमाणात गांजा जप्त करून मोठे यश मिळवले आहे. या कारवाईनंतर परिसरात मोठी खळबळ उडाली असून गुन्हेगारी विश्वात चांगलाच धक्का बसला आहे.

ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक सायकर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. ही कारवाई बार्शी शहर पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक बालाजी कुकडे, तालुका व शहर पोलीस स्टेशनच्या संयुक्त पथकांनी यामध्ये सक्रिय सहभाग नोंदवला. बार्शी तालुका पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक दिलीप ढेरे यांनी या कारवाईत पुढाकार घेतला. या सर्वांच्या एकत्रित प्रयत्नांतून एवढ्या मोठ्या प्रमाणात गांजाची जप्ती करण्यात यश आले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणात अजून सखोल तपास सुरू असून संबंधित आरोपींबाबत आवश्यक ती कारवाई करण्यात येत आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात मादक पदार्थ हाती लागल्यामुळे या नेटवर्कचा उलगडा करण्यासाठी पोलिस विशेष दक्षता घेत आहेत. स्थानिक गुन्हेगारी जगतात यामुळे मोठी हालचाल निर्माण झाली आहे.

बार्शी शहर व तालुक्यातील नागरिकांनी या कारवाईचे स्वागत केले असून पोलिसांच्या धाडसाचे सर्वत्र कौतुक होत आहे. पोलिस प्रशासनाच्या या कार्यवाहीमुळे अवैध धंदे करणाऱ्यांमध्ये दहशत निर्माण झाली असून पुढील काळात असे प्रकार रोखण्यासाठी पोलीस अधिक कठोर पावले उचलतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Reactions

Post a Comment

0 Comments