जे.आर.व्ही. प्रमुख विवेक दिक्षित यांच्या समर्थ प्रसाद बांधकाम प्रकल्पाचे सोलापुरात भूमिपूजन
सोलापूर, (कटूसत्य वृत्त):- भारतातील सर्वश्रेष्ठ आर्किटेक्ट च्या माध्यमातून समर्थ प्रसाद या प्रकल्पाचे डिझाईन करण्यात आले आहे. उच्च दर्जाचे बिल्डिंग तयार होणार असून तिसऱ्या मजल्यावर सर्व अत्याधुनिक सुविधा देण्यात येणार असल्याची माहिती प्रमुख व्यवस्थापक विवेक दीक्षित यांनी आज बुधवार रोजी पत्रकार परिषदेत दिली.
सोलापुरातील नवीन आरटीओ जवळच समर्थ प्रसाद या प्रकल्पाचे बांधकाम सुरू आहे. जे. जे. आर. व्हि. यांच्या माध्यमातून सध्या अक्कलकोट येथे समाधी मठाचे बांधकाम सुरू आहे. त्याचेच प्रसाद म्हणून त्यांनी सोलापुरात नवीन आरटीओ जवळ समर्थ प्रसाद हा अत्याधुनिक सोयी असलेला बांधकाम प्रकल्प सुरू केला आहे.
यावेळी सदर प्रकल्पाविषयी बोलताना दीक्षित यांनी तिसऱ्या मजल्यावर चिल्ड्रन प्ले एरिया प्लस गार्डन आणि अकराव्या मजल्यावर टेरेस अमिनेटिज. यामध्ये महत्त्वाचे ओपन एअर योगा एरिया, ओपन एअर वॉकिंग ट्रॅक, ओपन एअर पार्टी लाऊंज, जिम, पोडियम पार्किंग, सिनिअर सिटीझन सीटिंग लाउंज अशा व अनेक विविध सोयी दिलेल्या आहेत.
या समर्थ प्रसाद प्रकल्पामध्ये व्यावसायिक दुकान गाळे हे ग्राउंड प्लस पहिल्या मजल्यावर उप- लब्ध आहेत. व्यावसायिक दुकान गाळ्यासमोर १४० फूट इतका ओपन एरिया मिळणार आहे तसेच प्रत्येक दुकानात वॉशरूम व पाण्याची सोय कायमस्वरूपी रा- हणार आहे.
तसेच २ बीएचके, ३ बीएच- के उपलब्ध आहेत. आधुनिक सुख सोयी सह अगदी दर्जात्मक बांधकाम देणार असल्यामुळे उच्च दर्जाचे सर्व इंजिनिअर्स या प्रकल्पावर काम करीत आ- हेत. त्यामुळे एक आधुनिक सुख सोयी असलेला प्रकल्पचा आनंद मिळणार आहे त्यामुळे एक वेळ अवश्य भेट देऊन प्रकल्पाची पाहणी करावी असे आवाहन जे. जे. आर. व्हि. यांच्या वतीने करण्यात आले आहे. सदर पत्रकार परिषदेला शिल्पा विवेक दीक्षित, हेमंत बोणा उपस्थित होते.
चौकट
सोलापुरातील समर्थ प्रसाद प्रकल्पाशी माझे आत्म्याचे संबंध : विवेक दीक्षित
जे.जे.आर.व्हि. कंपनीने देशातील सर्वश्रेष्ठ कंपन्यासोबत काम केले असून सध्या मुंबईत देखील बांधकामाचे प्रकल्प सुरू आहेत. मात्र सोलापुरातील समर्थ प्रसाद प्रकल्पाशी माझे आत्म्याचे संबंध निर्माण झाले आहे हे सांगताना श्री स्वामी समर्थांचे निस्सीम भक्त असलेल्या श्री विवेक दीक्षित यांचा कंठ दाटून आला. स्वामींच्या कृपेमुळेच आपण सोलापुरात हा समर्थ प्रसाद प्रकल्प सुरू करत असून या बांधकाम प्रकल्पाचे 'भारतातील सर्वश्रेष्ठ आर्किटेक्ट द्वारा बनवलेले पहिलेच डिझाईन असेल असे आवर्जून सांगितले.
0 Comments