मनोरमा को-ऑप. बँकेची २९ वी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत
ग्राहकांच्या ठेव सुरक्षेला प्राधान्य हेच ‘मनोरमा’चे ध्येय
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- मनोरमा को ऑप. बँकेची २९ वी वार्षिक सर्वसाधारण सभा बेन्नूर नगर येथील मुख्य कार्यालयातील मनोरमा भवनात शुक्रवार (ता. १५) सकाळी उत्साहात पार पडली.
प्रारंभी ज्येष्ठ सभासद वसंतराव विधाते, चंद्रकांत माने, आदिनाथ सगरे, आर. पी. पाटील, मच्छिंद्र पाटील, माधवराव गव्हाणे, चंद्रकांत माने, श्रीहरी माने, महेंद्र कुलकर्णी, अतुल कुलकर्णी, विश्वासराव मोहिते, विजयकुमार फताटे, विजय शाबादी यांच्या हस्ते दीप्रप्रज्वलन करण्यात आले.
सभेच्या सुरुवातीस डॉ.ऋचा मोरे - पाटील यांनी प्रस्ताविक करत सभेला सुरुवात केली त्यानंतर सीईओ शिल्पा कुलकर्णी -मोहिते यांनी क्रमवार विषय वाचन केले.
यावेळी चेअरमन श्रीकांत मोरे यांनी अध्यक्ष स्थान स्वीकारत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सभासद, ठेवीदारांशी संवाद साधत ग्राहकांच्या ठेव सुरक्षेला प्राधान्य हेच मनोरमा बँकेचे उद्दिष्ट असल्याचे प्रतिपादन केले. बचत गटाच्या माध्यमातून महिलांना सक्षम करण्याचे काम मनोरमा बँक करत आहे. अवघ्या ७२ तासातच ५० टक्के कर्जे ही लघु उद्योगाला देण्याचे ठरवण्यात आले आहे. आरबीआयच्या बँकिंग रेग्युलेशन अॅक्टनुसार कामकाज करणारी आपली बँक असून आजही मनोरमा बँकेने सलग ७ वर्षे ०% NPA राखले असल्याचे त्यांनी सांगितले. बँकेच्या अहवाल सालातील आर्थिक प्रगतीचा आलेख मांडला. बँकेचे वसूल भागभांडवल १५.८० कोटी असून राखीव व इतर निधी १४.८८ कोटी आहे. ठेवी ६५३.०५ कोटी असून कर्जे ४०६.०८ कोटी आहे. एकूण गुंतवणूक १८९.१९ कोटी असून मिश्र व्यवसाय आजपर्यंत १०६०.०० कोटी झाल्याचे सांगून सभासदांना १०% लाभांश देत असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी सभासदांनी विचारलेल्या प्रश्नांना समर्पक उत्तरे चेअरमन श्रीकांत मोरे यांनी दिली.
व्यासपीठावर मनोरमा सखी मंचच्या अध्यक्षा सौ. शोभा मोरे, व्हा. चेअरमन संतोष सुरवसे, कार्याध्यक्षा सौ. अस्मिता गायकवाड, संचालक डॉ. सुमित मोरे, डॉ. मिताली मोरे, डॉ. ऋचा मोरे -पाटील, बोर्ड ऑफ मॅनेजमेंटचे अध्यक्ष अॅड. सुरेश गायकवाड, गणपत कदम, शुभांगी भोसले, सीए मैनुद्दिन नदाफ, सीए ऋषिकेश शहा, सुहास भोसले, विकास सक्री, दत्तात्रय मुळे, प्रशांत शहापूरकर, प्रा. बब्रुवाहन रोंगे, डॉ. सत्यजित वाघचवरे, गजेंद्र साळुंके, डॉ. सत्यवान वाघचवरे, संतोष मोटे, कविता कुलकर्णी, सीईओ शिल्पा कुलकर्णी-मोहिते आदी उपस्थित होते. प्रसंगी सीए ऋषिकेश शहा, बोर्ड ऑफ मॅनेजमेंटचे अध्यक्ष अॅड. सुरेश गायकवाड यांचा सत्कार डॉ. सुमित मोरे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी संचालक मंडळासह सभासद, खातेदार, अधिकारी, कर्मचारी, मनोरमा परिवारातील सर्व सदस्य उपस्थित होते.
आभार व्हा.चेअरमन संतोष सुरवसे यांनी मानले.

0 Comments