सप्टेंबरअखेर सोलापूर-मुंबई विमानसेवा सुरू
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सोलापूरकरांची दीर्घकाळ प्रलंबित असलेली सोलापूर ते मुंबई विमानसेवेची मागणी आता पूर्णत्वास येत आहे. नागरी उड्डाण महानिदेशालय (DGCA) यांच्याकडून स्टार एअरला सोलापूर ते मुंबई प्रवासी विमान सेवा सुरू करण्याची परवानगी मिळाली असून ही सेवा सप्टेंबर 2025 अखेरपर्यंत सुरू होणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली.
महाराष्ट्र एअरपोर्ट ऑथॉरिटी व स्टार एअर यांच्यातील करारानंतर ही सेवा सुरू करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. लवकरच स्टार एअर तिकीट विक्रीला प्रारंभ करणार असून सप्टेंबर अखेरीस पहिले प्रवासी विमान सोलापूरहून मुंबईकडे रवाना होणार आहे. या सेवेमुळे सोलापूर शहराला औद्योगिक, व्यापारी, पर्यटन आणि शैक्षणिक विकासाला मोठा हातभार लागणार असून नागरिकांना थेट मुंबईशी हवाई मार्गे जोडले जाण्याचा लाभ मिळणार आहे.
दरम्यान, राज्य शासनाने “उडान” योजनेअंतर्गत सोलापूर-पुणे-मुंबई विमानसेवा सुरू करण्यासाठी 14 कोटी रुपयांची व्हायाबिलिटी गॅप फंडिंगची तरतूद केली आहे. उपमुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळ बैठकीत या निर्णयाला मंजुरी देण्यात आली आहे.
0 Comments