महापालिकेकडून आता प्रभागनिहाय स्वच्छता
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी स्वच्छ सोलापूर सुंदर सोलापूर करण्याकडे भर दिला आहे. त्या अनुषंगाने सोलापूर महानगरपालिका प्रशासनात ३६५ दिवस शहर स्वच्छताचे नियोजन करण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानुसार महानगरपालिकेने २६ प्रभागांमध्ये स्वच्छता मोहिमेचा विशेष आराखडा तयार केला आहे. त्यासाठी एक समिती गठीत केली आहे. या
समितीच्या माध्यमातून २६ प्रभागांमध्ये एकाचवेळी दररोज विशेष स्वच्छता मोहीम घेतली जाणार आहे.
महापालिकेच्या घनकचरा विभागाच्या वतीने शहरांमध्ये विविध स्वच्छता म्हणून राबवल्या जात आहेत. आतापर्यंत चार विशेष स्वच्छता मोहिम घेण्यात आल्या. रस्ते, चौक, रस्ते दुभाजक, स्मशानभूमी, चौक चकाचक करण्यात आले. मात्र १५ ऑगस्ट रोजी पालकमंत्री जयकुमार मोरे आणि शहरातील स्वच्छता मोहिमेचा, शहरातील कचरा संकलनाचा आढावा घेतला. यामध्ये शहर स्वच्छतेला प्राधान्य ३६५ दिवस म्हणजे वर्षभर स्वच्छता मोहिम घेण्याचा आराखडा तयार करण्याच्या सूचना केल्या होत्या.
प्रभागनिहाय स्वच्छता करण्याचे नियोजन केले आहे. चार जणांची समिती गठित केली आहे. प्रभाग निहाय स्वच्छता केली जाणार आहे प्रत्येक प्रभाग निहाय नियंत्रण अधिकारी म्हणून जबाबदारी देऊन अतिरिक्त मनुष्यबळ, कचरा विभागातील कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून स्वच्छता मोहीम मोहीम राबवली जाणार आहे. त्या मोहिमेसाठी लागणारी यंत्रणा, साहित्य, निधी, कोणत्या भागात कधी, कशी स्वच्छता केली जाणार याबाबतचा वर्षभराचे नियोजन केले आहे.
शासनाकडून १५ कोटी रुपयांचा निधी घनकचरा विभागात मिळाला असून त्यासाठी संकलन केंद्र आणि घंटागाड्यांच्या खरेदीसाठी नियोजन त्यानुसार महापालिका प्रशासनाने केले जाणार आहे.
0 Comments