Hot Posts

6/recent/ticker-posts

पुणे - सोलापूर महामार्गावर विचित्र अपघात, कारने २ अलिशान गाड्यांना उडवले, दोघांचा जागीच मृत्यू

 पुणे - सोलापूर महामार्गावर विचित्र अपघात, कारने २ अलिशान गाड्यांना उडवले, दोघांचा जागीच मृत्यू  




सोलापूर (कटूसत्य वृत्त):-पुणे - सोलापूर महामार्गावर यवतजवळ अतिशय भयंकर अपघात झाला आहे. यवतमध्ये एका कारने दुभाजक ओलांडून दुसऱ्या बाजूच्या दोन आलिशान गाड्यांना जोरात धडक दिली. या विचित्र अन् भयंकर अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर 5 जण जखमी झाले आहेत. जखमींना जवळच्या रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. अपघातानंतर पुणे-सोलापूर महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली होती. यवत पोलिसांनी तात्काळ घटनास्थळावर धाव घेतली अन् वाहतूक सुरळीत केली. पोलिसांनी अपघातग्रस्त वाहने बाजूला केली. त्यानंतर मृतदेह पोस्टमार्टमासाठी पाठवले. या अपघातातील मयतमध्ये उरुळी कांचन व यवत येथील दोघांचा समावेश आहे. तर जखमींची नावे अद्याप समजू शकली नाहीत.

उरळी कांचनमधील अशोक विश्वनाथराव थोरबोले आणि यवतमधील गणेश धनंजय दोरगे यांचा या अपघातात जागेवरच मृत्यू झाला. अपघातात मृत्यू झालेल्या दोघांची नावे आहेत. याबाबत ज्ञानेश्वर विश्वनाथ थोरबोले यांनी यवत पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार राकेश मारूती भोसले (रा. बोरीभडक ता. दौंड) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून याप्रकऱणाचा तपास करण्यात येत आहे.

नग्न पूजेचा व्हिडिओ दाखवला, महिलेसोबत केलं अश्लील कृत्य, नागपुरात 'मामा'चा कारनामा
यवत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास ज्ञानेश्वर थोरबोले हे त्यांच्या जवळ असलेल्या चारचाकी गाडीतून सोलापूरच्या दिशेने निघाले होते. यावेळी पुणे - सोलापूर महामार्गावरून राकेश भोसले हा सोलापूरच्या बाजूकडून पुण्याकडे निघाला होता. यावेळी त्याचे त्यांच्या लाल रंगाच्या गाडीवरील नियंत्रण सुटले व गाडी थेट दुभाजक ओलांडून समोरून येणाऱ्या दोन चारचाकी गाड्यांना जोरदार धडक दिली. या अपघातात अशोक थोरबोले व गणेश दोरगे यांना जोरदार मार लागला होता. त्यांना तात्काळ नागरिकांच्या मदतीने यवत व उरुळी कांचन येथील रुग्णालयात दाखल केले असता दोघांचाही मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले.


Reactions

Post a Comment

0 Comments