राजराजेश्वरी शिक्षण संकुलात स्वातंत्र्य दिन उत्साहात
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- विनायक नगर येथील राजराजेश्वरी बालक मंदिर प्राथमिक शाळा व माध्यमिक प्रशाला यांच्या संयुक्त विद्यमाने ८९ वा भारतीय स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. प्रथम माजी विद्यार्थी चंद्रकांत सनके , शिल्पा सनके, गंगाधर सनके, कन्याकुमारी सनके यांच्या हस्ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले तदनंतर पालक शिक्षक संघाचे सदस्य शिवहार गाढवे, सचिन पवार, भाग्यश्री चिंताकिंदी, शारदा गीनानी आदी मान्यवरांच्या हस्ते ध्वजपूजन व ध्वजारोहण करण्यात आले.यावेळी प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका वैशाली कुंभार व माध्यमिक प्रशालेचे मुख्याध्यापक शिवानंद मेणसंगी आदी उपस्थित होते. राष्ट्रगीत, राज्यगीत, ध्वजगीत, संविधान, कवायत झाल्यानंतर साक्षी कुंभार, चैत्राली हणमगोंडा, ओमकार भाईकट्टी, अजान शेख, आराध्या संकना, अन्विता संकना, अमोगसिद्ध गुंडे, रुक्सार शेख आदी विद्यार्थ्यांनी भाषण केले.ये देश है मेरा, स्वर्ग से सुंदर हे स्फुर्ती गीत सादर केेले.प्रमुख अतिथीच्या हस्ते पहिली ते नववी पर्यंतच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा , शिष्यवृत्ती परीक्षेत प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक पटकाविलेल्या विद्यार्थ्यांचा व हर घर तिरंगा अंतर्गत घेण्यात आलेल्या वक्तृत्व स्पर्धेतील प्रथम द्वितीय, तृतीय क्रमांक मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. सनके परिवाराच्यावतीने शाळेतील गरीब, निराधार व अनाथ विद्यार्थ्यांना वह्या ,शालेय दप्तर बॅग, गणवेश, बूट, सॉक्स आदी शालेय शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. खाऊ वाटपानी कार्यक्रमाची सांगता झाली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एम. एस. बिराजदार यांनी केले कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्व शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेत्तर कर्मचारी वृंदानी परिश्रम घेतले.
0 Comments